logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

अमरापूर : कर्मयोगी आबासाहेब काकडे शाळेतील एच.एस.सी. निकालात घवघवीत यश

अमरापूर : नुकत्याच जाहीर झालेल्या एच.एस.सी. बोर्ड परीक्षेच्या निकालात कर्मयोगी आबासाहेब काकडे शैक्षणिक समूहाचे अमरापूर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील कला व विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. विज्ञान शाखेचा निकाल 100 टक्के तर कला शाखेचा निकाल 86.95 टक्के इतका आला आहे. विज्ञान शाखेतील 6 विद्यार्थ्यांनी आणि कला शाखेतील 1 विद्यार्थ्याने विशेष प्राविण्य मिळवले आहे. विद्यार्थ्यांनी मागील वर्षांची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवली आहे.

कु. स्नेहल संतोष कळमकर, कु. आर्या मंगेश गाडे, कु. वैष्णवी दिलीप शिंदे, कु. सानिका प्रताप कोळगे, कु. श्रावणी समीर दिवटे, कु. श्रेया कैलास कळमकर, कु. भक्ती नवनाथ सुसे, चि. यश राजेंद्र पोटफोडे, चि. जयदीप सतीश वावरे, चि. मयंक दादासाहेब आहेर आणि चि. अक्षय अंबादास शिंदे यांनी 70 टक्के पेक्षा अधिक गुण मिळवले. कला शाखेतील कु. फलके आरती रावसाहेब, कु. योगिता बप्पासाहेब खैरे आणि चि. गायकवाड ओम विजय यांनीही यश संपादन केले. विद्यालयाच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

कर्मयोगी आबासाहेब काकडे शैक्षणिक समूहाचे अध्यक्ष श्री. अॅड. डॉ. विद्याधरजी काकडे साहेब, सहप्रमुख सौ. हर्षदाताई काकडे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. डॉ. लक्ष्मणराव बिटाळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पृथ्वीसिंह काकडे, शैक्षणिक विभाग प्रमुख श्रीम. वंदना पुजारी, सहप्रमुख श्री. अशोक आहेर, विद्यालयाचे प्राचार्य श्री. भाऊसाहेब टाकळकर आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

12
809 views

Comment