अर्जुन नगर काटोल येथे बुद्ध जयंती साजरी
काटोल प्रतिनिधी :-
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती अर्जुन नगर काटोल जि. नागपूर महाराष्ट्र शाहीर परिषद पुणे शाखा काटोल भारत सांस्कृतिक मंडळ काटोल यांच्या संयुक्त विद्यमाने अर्जुन नगर येथील आंबेडकर पुतळ्याजवळ दि. १ में २०२६ रोज शुक्रवारला स. १० वा. बुद्ध जयंतीचा कार्यक्रम करण्यात आला.
प्रथम भगवान बुद्ध यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून बुद्ध वंदना घेण्यात आली या वेळी प्रभाकर ढोके यांनी मार्गदर्शन करून प्रकाश टाकला. मा. तानबा सिंगारे यांनी सविस्तर मार्गदर्शन करतांना सांगितले आपण हि २ हजार ५८८ वी जयंती साजरी करीत आहे. भारतातच नव्हे तर जगाच्या पाठीवर सर्वत्र जयंती साजरी होत आहे. त्यांनी जगाला शांतीचा महान संदेश दिला. बुध्द्धांचा जन्म ५६३ इ. स. पूर्व नेपाळच्या लूंबिनी वनात झाला.वयाच्या ८०व्या वर्षी उत्तरप्रदेश च्या कुशीनगर येथे त्यांचा महापरीनिर्वान झाला.
वडील शुद्धोधन आई महामाया यांच्या मृत्यूनंतर त्यांचे पालन पोषण मावशी प्रजापती गौतमीने केले. पत्नी यशोधरा, मुलगा राहुल जातीने शाक्या क्षत्रिय होते. त्यांचे पहिले गुरु अलारकलाम त्रिरत्न बुद्ध, धम्म,संघ बुध्दानी जीवनात चार दृश्य पाहिले १)वृद्ध व्यक्ती २)संन्याशी ३)बिमार व्यक्ती ४)मृत व्यक्तीचा अंत्यविधी हे सर्व पाहून त्यांनी २९व्या वर्षी गृहत्याग केला.त्यांना ज्ञान प्राप्ती३५ व्या वर्षी प्राप्त झाली. पिंपळाच्या झाडाखाली त्यांना ज्ञान प्राप्ती झाली. त्यांचा जन्म व ज्ञान प्राप्ती व महापरीनिर्वान एकाच दिवशी म्हणजे वैषाखि पौर्णिमेला झाले.जो बुध्दाचे तत्वज्ञान अंगीकारतो. त्याचा सर्वांगीन विकास होतो. बुद्धाच्या विचारांची गरज जगाला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोम्बर१९५६ ला नागपूर येथे बुद्ध धम्माची दिक्षा घेऊन लाखो अनुयायांना बुद्ध धम्माची दिक्षा दिली.
माला ठाकरे व त्यांचा संच यांनी गीत गायनातून भगवान बुध्दाचे विचार पटवून दिले. उपस्थित भाऊराव ढोणे तुकाराम शृंगारे, विठ्ठलरावं वानखेडे, प्रमोद तायडे, सौ. सावित्री डोंगरे द्रौपदा ढोके, मंदा शृंगारे लता राऊत कमला पिंपळशेंडे सावित्री बेलखोडे रुख्मा कुहीटे, गायिका शशिकला सिंगारे, सौ शकुंतला तायडे सुनीता भुजाडे,बेबी टेकाडे मीनाक्षी पारवे, रेखा तवले ज्ञानेश्वर कोळमकर कमलकिशोर वानखेडे दुर्गा निकोसे, वैशाली वानखेडे, अशोक कोळणकर संचालन प्रमोद तायडे यांनी केले तर आभार रितेशकुमार सिंगारे यांनी मानले.