गोंडपिपरी| महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा
गोंडपिपरी| जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, विठ्ठलवाडा येथे महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिनाचे आयोजन करण्यात आले. ध्वजारोहण शाळेचे मुख्याध्यापक राजू राजकोंडावार यांच्या हस्ते पार पडले, यावेळी 'वंदे मातरम्' हे राष्ट्रीय गीत गाण्यात आले.कार्यक्रमात शाळेतील इयत्ता १ ते ७ पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करण्यात आला. विविध उपक्रमांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांना पुरस्कार देण्यात आले. 'स्टुडंट ऑफ द इयर' पुरस्कार श्रेया गेडाम हिला प्रदान करण्यात आला. सुनील सातपुते यांच्या सेवानिवृत्ती निमित्त शाळेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.