logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

अभिनेते रमेश अगरवाल ‘भारत कला गौरव पुरस्कार’ाने सन्मानित.

संभाजीनगर (विशेष प्रतिनिधी – सुरज सुधाकरराव पवार)



किल्ले पर्यटन महाराष्ट्र आयोजित ‘स्टार ग्लोबल अवॉर्ड 2026’ सोहळा दिनांक 25 एप्रिल 2026 रोजी संभाजीनगर येथील मराठवाडा प्रबोधिनी सभागृहात भव्यदिव्य वातावरणात पार पडला. या सोहळ्यात ‘जयदेव’ (2001) हिंदी चित्रपटातील सुप्रसिद्ध अभिनेते रमेश अगरवाल यांना ‘भारत कला गौरव पुरस्कार 2026’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

हा प्रतिष्ठेचा पुरस्कार माजी खासदार सुनील गायकवाड, समृद्धी प्रकाशनचे संचालक बी. एन. खरात तसेच निर्माते खेवंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

या सन्मानामुळे अभिनेते रमेश अगरवाल यांच्या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत असून, त्यांच्या चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली होती.

21
5400 views

Comment