*बी.एड.महाविद्यालयात स्वागत व निरोप समारंभ उत्साहात साजरा
साकोली/भंडारा : डॉ. एस. राधाकृष्णन कॉलेज ऑफ एज्युकेशन, साकोली येथे बी.एड. प्रथम वर्ष विद्यार्थ्यांचा स्वागत सोहळा तसेच द्वितीय वर्ष विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ दिनांक 25 एप्रिल 2026 रोजी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमात विद्यार्थी, प्राध्यापक व मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.*
*या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून नवजीवन विद्यालय अँड ज्युनिअर सायन्स कॉलेज, जमनापूर साकोली येथील प्राचार्य डॉ. लोकानंद नवखरे सर तसेच ताराचंदजी निखाडे अध्यापक विद्यालय, साकोली येथील प्राचार्य खेमराज राऊत उपस्थित होते.*
*प्रमुख अतिथींच्या मार्गदर्शनात डॉ. लोकानंद नवखरे यांनी शिक्षक हा केवळ ज्ञानदाता नसून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व घडविण्याचा शिल्पकार असल्याचे स्पष्ट केले. नवजीवन विद्यालयातील शैक्षणिक नेतृत्व करताना त्यांनी गुणवत्ता, शिस्त आणि नवोपक्रम यांचा उत्कृष्ट संगम साधला असून त्यांच्या नेतृत्वामुळे शैक्षणिक वातावरण अधिक सक्षम आणि गतिमान झाले आहे. तर प्राचार्य खेमराज राऊत यांनी आपल्या मनोगतात शिक्षक व्यवसायातील निष्ठा, संयम आणि मूल्याधिष्ठित शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधत त्यांना आत्मविश्वासाने पुढे जाण्यास प्रेरित करणारी त्यांची शैली विशेष उल्लेखनीय होती*
*कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विभाग प्रमुख प्रा. अक्षय पुस्तोडे होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना शैक्षणिक गुणवत्ता, व्यक्तिमत्व विकास आणि सामाजिक बांधिलकी यांचा समतोल साधण्याचे आवाहन केले.*
*कार्यक्रमात बी.एड. प्रथम वर्ष विद्यार्थ्यांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले, तर द्वितीय वर्ष विद्यार्थ्यांनी आपल्या आठवणींना उजाळा देत भावनिक वातावरण निर्माण केले. विविध सांस्कृतिक कार्यक्रम, मनोगत आणि सत्कार समारंभ यामुळे कार्यक्रम अधिक रंगतदार झाला.*
*या यशस्वी कार्यक्रमाचे श्रेय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. ब्रह्मानंद करंजेकर, अध्यक्ष डॉ. सोमदत्त करंजेकर, संस्था सचिव वृंदा करंजेकर तसेच व्यवस्थापन समितीचे सर्व पदाधिकारी, प्राचार्य व प्राध्यापकवर्ग यांच्या मार्गदर्शनाला व विद्यार्थ्यांच्या सक्रिय सहभागाला जाते.*
*कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाने उपस्थितांना प्रेरणादायी व आनंददायी अनुभव दिला.*