माथार्जून येथे बसस्थानकावर ट्रॅक्टर पल्टी
माथार्जुन बसस्टॉपजवळ ट्रॅक्टर पलटी; जीवितहानी टळली
झरि जामणी (प्रतिनिधी) : झरी ते पांढरकवडा मार्गावर रविवारी दुपारी माथार्जुन बसस्टॉपजवळ ट्रॅक्टर पलटी झाल्याची घटना घडली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र मोठा अनर्थ टळला.
मिळालेल्या माहितीनुसार, ट्रॅक्टर भरधाव वेगात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाले. अपघातानंतर चालक घटनास्थळावरून फरार झाल्याची माहिती आहे.
घटना घडताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ धाव घेत मदतकार्य सुरू केले. या अपघातात ट्रॅक्टरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.
दरम्यान, या घटनेची माहिती संबंधित पोलिसांना देण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.