logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

सहा ब्रास वाळूसह १५ लाखांची दोन वाहने जप्त



जळगाव : वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्या दोन वाहनांवर तालुका पोलिसांनी कारवाई करीत सहा ब्रास वाळूसह १५ लाख रुपये किमतीची दोन वाहने जप्त केली. ही कारवाई २५ एप्रिल रोजी गाढोदा, किनोद दरम्यान करण्यात आली. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अवैध वाळू वाहतूक होत असल्याची माहिती तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक शशिकांत पाटील यांना मिळाली होती. त्यानुसार चालक फैजलखान असलमखान पठाण (२५, रा. पिंप्राळा) याच्याकडे वाळू वाहतुकीचा परवाना मिळून आला नाही. पथकाने चार ब्रास वाळू व वाहन जप्त केले. दुसऱ्या कारवाईत २ ब्रास वाळूची वाहतूक करणारे डंपर पथकाने पकडले. त्यावरील चालक निखिल गजानन पाटील (रा. साकेगाव) याच्याकडेही वाळू वाहतुकीचा परवाना नव्हता. या प्रकरणी पोकॉ प्रवीण कोळी यांनी तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली

3
290 views

Comment