logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

संकल्प निर्माण फाऊंडेशन तर्फे आयोजित भीम गीत गायनाला अभूतपूर्व प्रतिसाद

*भीम वादळा पुढे निसर्गाचे वादळ ही शांत झाले...!*

संकल्प निर्माण फाउंडेशन तर्फे आयोजित भीमगीत गायनाला अभूतपूर्व प्रतिसाद...!

नेहमी आम्हाला मार्गदर्शन करत तन - मन - धनाने सहकार्य करणारे मान्यवर समाजबांधवांनी पोलिस मैदान नंदुरबार येथे हजारोंच्या संख्येने उपस्थिति देत भीमगीत गायनाचा सोहळा यशस्वी केला. या कार्यक्रमात फक्त नंदुरबार शहरातीलच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यामधुन तसेच ग्रामीन भागातील मान्यवर समाजबांधव देखील उपस्थित होते. सर्वांचे संकल्प निर्माण फाउंडेशन चे सर्व पदाधिकारी कडून खुप खुप आभार'...! *आम्ही आपल्या सर्वांचा सहकार्याने गेली कित्येक कार्यक्रम मोठ्या संख्येने यशस्वी केले आहेत त्यात मातारमाई आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक व जेतवन बुद्धविहाराचा लोकार्पण सोहळा असो किंवा कुठलाही महत्वाचा दिवस नसतांना बिहार स्थित बुद्धगया येथील महाबोधिविहार मुक्ति आंदोलने व भव्य* *मोटारसायकल रॅली काढुन शासन प्रशासनाचे लक्ष वेधले व ब्लड फॉर बाबासाहेब अभियान असो असे अनेक प्रबोधनपर कार्यक्रम,आंदोलने आपल्यामुळे यशस्वी केले आहेत* आणि
काल परवाचा कार्यक्रमात पावसाचे सावट होते. हवामान विभागाने वारा वादळासह पाऊस सांगितला होता परंतु *भीम वादळा पुढे निसर्ग वादळ ही शांत* झाल्याच आपण पाहिले. गितगायनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात यशस्वी झाला याचे सर्व श्रेय तुम्हाला म्हणजे समाजबांधव प्रमुख मान्यवर कार्यकर्ते यांना जाते कारण आपण तन मन धनाने योगदान दिल्यामुळेच सर्व कार्यक्रम मोठ्या प्रमाणात यशस्वी झाले आहेत.त्यात संकल्प निर्माण फाउंडेशनाचे पदाधिकारी यांचा ही मोलाचा वाटा आहे. *नियोजनबद्ध कार्यक्रमात सामाजिक एकतेचा संदेश दिला

9
811 views

Comment