भोंदू मनोहर भोसलेला 3 दिवसांची पोलीस कोठडी; आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी साथीदारासह कारवाई
सोलापूर: जिल्ह्यातील कुर्डूवाडीत भोंदूगिरी आणि फसवणूक प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे. व्यवसायात भरभराटीचे आमिष दाखवून एका तरुणाची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी भोंदू मनोहर भोसले आणि त्याचा साथीदार विशाल वाघमारे यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात दोघांना न्यायालयात हजर करण्यात आले असता माढा दिवाणी आणि फौजदारी न्यायालयाने त्यांना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.