सातारा जिल्ह्यातील जावली तालुक्यातील ओझरे गावात आज सायंकाळी अंदाजे ५ ते ६ वाजण्याच्या दरम्यान मुसळधार पावसामुळे दुर्दैवी घटना घडली आहे.
जिल्हा परिषद श
सातारा जिल्ह्यातील जावली तालुक्यातील ओझरे गावात आज सायंकाळी अंदाजे ५ ते ६ वाजण्याच्या दरम्यान मुसळधार पावसामुळे दुर्दैवी घटना घडली आहे.
जिल्हा परिषद शाळेची नव्याने बांधलेली भिंत अचानक कोसळल्याने शांताबाई बाबुराव लकडे (वय ६२) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार, पावसाच्या तीव्रतेमुळे भिंतीची मजबुती कमी होऊन ही दुर्घटना घडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदतकार्य सुरू केले. संबंधित महिलेचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी मेढा येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळताच प्रशासन आणि संबंधित अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून, पुढील तपास सुरू आहे. तसेच, बांधकामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, संबंधितांवर कारवाईची मागणी स्थानिकांकडून होत आहे.