logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

हरदोली येथे सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्यात ५ जोडपी विवाहबद्ध १० वर्षांत ७२ जोडपी झाली विवाहबद्ध.

​सामूहिक विवाह सोहळे ही सामाजिक ऐक्य जपण्याची चळवळ - आमदार राजू कारेमोरे

हरदोली येथे सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्यात ५ जोडपी विवाहबद्ध
१० वर्षांत ७२ जोडपी झाली विवाहबद्ध.

विलास केजरकर भंडारा.

भंडारा :- विवाह सोहळ्यांमध्ये होणारा अफाट खर्च, वेळेची बचत आणि त्यामुळे कुटुंबावर येणारे आर्थिक ओझे टाळण्यासाठी सामूहिक विवाह संकल्पना समाजासाठी मोठा दिलासा देणारी आहे. बदलत्या सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीत हे सोहळे केवळ खर्च वाचवत नाहीत तर सामाजिक एकता वृद्धिंगत करतात असे प्रतिपादन आमदार राजू कारेमोरे यांनी केले.
ते ​हरदोली येथील लबान तांडा पटांगणावर आयोजित सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याप्रसंगी मार्गदर्शन करतांना बोलत होते.
या सोहळ्याला राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक दिग्गज नेत्यांनी उपस्थिती दर्शवून नवदांपत्यांना शुभाशीर्वाद दिले.
​ कार्यक्रमाला व्यासपीठावर खासदार डॉ. प्रशांत पडोळे, विधान परिषद सदस्य डॉ. परिणय फुके, माजी मंत्री नाना पंचबुद्धे, राष्ट्रवादीचे नेते धनंजय दलाल, किसान सभेचे अध्यक्ष माधवराव बांते, सदानंद इलमे, नाना कांबळे, आणि विवाह सोहळ्याचे मुख्य संयोजक सदाशिव ढेंगे प्रामुख्याने उपस्थित होते.
त्यावेळी जिल्हा परिषद सभापती आनंद मलेवार, जिल्हा परिषद सदस्य देवा इलमे, पत्रकार राजू बांते, यशवंत थोटे, गिरीधर मोटघरे, कॉन्ट्रॅक्टर छगन बोल्लोरे, प्रल्हाद किंमत्कार, महादेव पचघरे जिल्हा परिषद सदस्य, सरपंच हरदोली अलका झंझाड, सरपंच सितेपार विजय झंझाड, सरपंच सालेबर्डी सतीश झंझाड, सरपंच वडेगाव ईश्वर माटे, सरपंच कांबळे निलज, माजी सरपंच काटी रवींद्र बाभरे, कैलास मते, लोकेश सार्वे उपसरपंच, मोहपत झंझाड, ग्राम पंचायत सदस्य दिनेश बांते, अतुल फेंडर, भाग्यश्री धांडे, निशा झंझाड, दिक्षा माटे, गोकुळ गायधने, भिवाजी गायधणे, शोभराम बुरडे, इजी गंगाधर हटवार, गुणवंत बुरडे, सूर्यकांत सेलोकर, मुख्याध्यापक ओमप्रकाश चोले, मुख्याध्यापक किशोर ईशवरकर, आठवण बांडेबुचे, अन्य जिह्यातील व तालुक्यातील पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
खासदार डॉ. प्रशांत पडोळे,​ आमदार परिणय फुके व माजी शिक्षणमंत्री नाना प़ंचबुध्दे यांनी आपले विचार मांडताना सांगितले की, "सर्वधर्मीय सामूहिक विवाहांमुळे विविध जाती-धर्मातील बंधुभाव स्नेह जुळतो ही केवळ खर्च वाचवण्याची पद्धत नसून, सामाजिक समतेचा संदेश देणारी एक मोठी चळवळ आहे.असे मान्यवरांनी आपल्या भाषणातून सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोपाल बुरडे, पंढरीनाथ झंझाड यांनी केले. व प्रास्ताविक मुख्य आयोजक तथा माजी सरपंच सदाशिव ढेंगे यांनी केले. तर उपस्थितांचे आभार डॉ. ज्ञानेश्वर माटे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राहुल बुरडे, शशिकांत गायधने, गजानन इलमे, विजय झंझाड, कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता राहुल बुरडे, शशिकांत गायधने, गजानन इलमे, विजय झंझाड, अनिल झंझाड, मोरेश्वर झंझाड, पराग झंझाड, अजय झंझाड, राजेश बुरडे, प्रमोद ढेंगे, महेंद्र झंझाड, मानिक शेंडे, राजू झंझाड, मंगेश धांडे, पारस झंझाड, अमोल इलमे, विनोद पाटील, नवीन झंझाड, राधेश्याम झंझाड, राजू झंझाड, शोभराम बुरडे, कैलास धांडे, गजानन झंझाड, सुघ्यानदेव झंझाड, धनराज बांते, राजकुमार बुरडे, रवींद्र झंझाड, धनलाल कंगाले, रामभाऊ बांते, बंडू संपत झंझाड, पंढरीनाथ तांदूळकर, लक्ष्मिकांत सार्वे, ओम कहाळकर, महेश दाने, मयूर दाने, चंद्रकिरण गायधने, सुनील झंझाड, रुपेश झंझाड, राजहंस झंझाड, सिसुपाल वणवे, अविनाश सलामे, उमेश झंझाड, संजय झंझाड, जयपाल वणवे, रमेश डुंभरे, विशाल भोयर यांच्यासह हरदोली ग्रामस्थांनी अहोरात्र परिश्रम घेतले. या सोहळ्याला जिल्हा परिषद सदस्य, विविध गावांचे सरपंच आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

*​१० वर्षांची यशस्वी परंपरा*

​हरदोली येथील या उपक्रमाचे हे १० वे वर्ष असून, आतापर्यंत गेल्या दहा वर्षांत एकूण ७२ जोडपी विवाहबद्ध झाली आहेत. यंदाच्या सोहळ्यात ५ जोडप्यांनी उपस्थित मान्यवरांच्या साक्षीने नवीन आयुष्याची सुरुवात केली.

*​नववधूंना 'माहेरची साडी' अन् भेटवस्तू*

​या सोहळ्याचे खास वैशिष्ट्ये म्हणजे सामाजिक बांधिलकी म्हणून हरदोली​ग्राम पंचायतीतर्फे प्रत्येक नवरी मुलीला 'माहेरची साडी' देण्यात आली. ​मंगेश धांडे आणि संजय झंझाड यांच्याकडून नवविवाहितांना संसारोपयोगी ५ भांडी भेट म्हणून देण्यात आली.

*Devashish Govind Tokekar*
*VANDE Bharat live tv news Nagpur*
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
*Indian Council of press,Nagpur*
Journalist Cell
*All India Media Association
Nagpur*
*District President*
*Delhi Crime Press*
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
*INDIAN PRESS UNION*
District Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

2
603 views

Comment