logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

मुख्याधिकाऱ्यावर गोळीबार करून जीवे मारण्याचा प्रयत्न;खोट्या गुन्ह्याचा आरोप...

मुख्याधिकाऱ्यावर गोळीबार करून जीवे मारण्याचा प्रयत्न;खोट्या गुन्ह्याचा आरोप...


नेवासा (*शिवप्रहार न्यूज*)- शासकीय कामासाठी जिल्हाधिकारी कार्यालय येथे जात असताना रात्री पावणेआठच्या सुमारास उपनगराध्यक्षांचे पतीने नेवासा येथे आपल्यावर जीवे मारण्याच्या हेतूने कट्ट्यातून गोळी झाडल्याची फिर्याद नगरपंचायतच्या मुख्याधिकार्‍यांनी पोलीस ठाण्यात दिली असून त्यावरुन आम आदमी पक्षाचे नेते व उपनगराध्यक्षा शालिनी सुखदान यांचे पती संजय सुखदान यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान, मुख्याधिकार्‍यांवर गैरव्यवहाराचे आरोप करत खोटा गुन्हा दाखल केल्याचे सुखदान समर्थकांनी नेवासा बंदचे आवाहन केले आहे.
याबाबत नेवासा नगरपंचायतचे मुख्याधिकारी निखिल लक्ष्मण फराटे (वय 40) रा. मांडवगण फराटा ता. शिरुर जि. पुणे यांनी फिर्याद दिली असून त्यात म्हटले की, 13 एप्रिल रोजी रोजी रात्री पावणेआठ वाजण्याचे सुमारास मी माझ्या चारचाकी वाहनामध्ये (एमएच 12 व्हीव्ही 7213) बसून जिल्हाधिकारी कार्यालय येथे शासकीय कामासाठी जात असताना संजय लक्ष्मण सुखदान याने त्याच्या ताब्यातील बुलेट मोटार सायकलने मला जिवे मारण्याच्या उद्देशाने माझ्या चारचाकी गाडीवर जोराची धडक दिली. म्हणून मी घाबरुन तेथून गाडीमध्ये बसून नेवासा फाट्याकडे जात असताना नेवासा शहरातील खोलेश्वर मंदिराच्या चौकाच्या पुढे आलो असता तेथे संजय सुखदान हा त्याच्या बुलेट मोटारसायकलवर जोरात आला व त्याची बुलेट मोटारसायकल माझ्या चारचाकी गाडीला आडवी लावली, म्हणून मी गाडीच्या खाली उतरलो असता संजय सुखदान याने त्याच्या कंबरेला हात घालुन गावठी कट्ट्यातून माझ्या दिशेने फायर केला. म्हणून मी पटकन खाली वाकलो. त्यामुळे मला गोळी लागली नाही. त्याचवेळी संजय सुखदान याने दुसरा फायर केला असता त्याच्या गावठी कट्ट्याचा ट्रिगर अडकल्याने फायर झाला नाही म्हणून मी वाचलो व घाबरुन तेथून गाडीमध्ये बसून निघून गेलो. तसेच मी नेवासा नगरपंचायतमध्ये शासकीय कर्तव्य पार पाडत असताना संजय सुखदान हा तेथे येवून मला अर्वाच्य भाषेत शिवागीळ करुन मला जिवे मारण्याची धमकी देवून मी करत असलेल्या सरकारी कामात अडथळा आणला आहे. म्हणून माझी संजय लक्ष्मण सुखदान (रा. नेवासा) याच्याविरुध्द फिर्याद आहे. या फिर्यादीवरुन पोलीस ठाण्यात संजय सुखदान यांच्यावर शस्त्र अधिनियम 1959 चे कलम 25, 3, भारतीय न्याय संहिता कलम 109(1),126(2), 132, 351(2), 351(3), 352 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान नेवासा नगरपंचायतच्या मुख्याधिकार्‍यांवर लाखो रुपयांच्या गैरव्यवहाराचे आरोप करत कारवाईची मागणी करण्यात आल्यानंतर सूडभावनेतून अ‍ॅड. संजय सुखधान यांच्यावर गोळीबार केल्याचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा समर्थकांनी केला आहे.या प्रकरणाच्या निषेधार्थ आज सोमवारी नेवासा पंचायत समिती प्रवेशद्वारासमोर नागरिकांच्या वतीने आंदोलन छेडण्यात येणार आहे.

*Devashish Govind Tokekar*
*VANDE Bharat live tv news Nagpur*
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
*Indian Council of press,Nagpur*
Journalist Cell
*All India Media Association
Nagpur*
*District President*
*Delhi Crime Press*
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
*INDIAN PRESS UNION*
District Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

0
12 views

Comment