बिबट्याच्या हल्ल्यात दहा वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू
शहापूर साजिद शेख /ठाणे जिल्हा प्रतिनिधी
शहापूर तालुक्यातील डोळखांब वनपरिक्षेत्र हद्दीतील कळबांडे लाद्याची वाडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात दहा वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे कृष्णा भागा आगिवले राहणार लाद्याची वडी असे मृत बालकाचे नाव आहे आज सकाळी गावाशेजारी दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्याच्यावर धडक घातली त्यात जखमी होऊन त्याचा जागेत मृत्यू झाला आहे या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परिणामी या प्रकरणामुळे वनमंत्र्यांनी केलेल्या सूचनांना वन अधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखवल्याचे बोलले जात आहे. बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये भेटीचे वातावरण निर्माण झालेले आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार कृष्णा आगविले हा मुलगा सकाळच्या सुमारास घराजवळ परिसरात अचानक असताना बिबट्याने त्याच्यावर हल्ला केला या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला या घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर घटनास्थळी गर्दी केली तथापि या घटनेनंतर वनविभागाच्या कार्यपद्धतीवर ग्रामस्थानी नाराजगी व्यक्त केली आहे त्या दुर्दैवी घटनेमुळे आगविले कुटुंबावर दुकानचा डोंगर कोसळला असून संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त जात आहे.