दोन गावठी कट्यांसह पाच जिवंत काडतूस जप्त
जळगाव : दहशत पसरविण्यासाठी
गावठी कट्टा व जिवंत काडतूस घेऊन दुचाकीवर जात असलेल्या राहुल कुवरसिंग पावरा (२२, रा. उमर्टी, ता. चोपडा), गणपत प्रभाकर किर्तने (२८, रा. असोला बाजार, जि. हिंगोली) या - दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केले. दुसऱ्या . कारवाईमध्ये नशिराबाद पोलिसांनी न रेकॉर्डवरील गुन्हेगार कमलाकर प्रभाकर महाजन (३६, रा. नशिराबाद) -. याला कट्टयासह अटक केली. दोन्ही कारवाईत दोन कट्टे व पाच जिवंत काडतूस हस्तगत करण्यात आले आहे.
चोपडा तालुक्यातील उमर्टी येथून कृष्णापूर ते मामलदेमार्गे चोपड्याकडे - दोन संशयित दुचाकीवरून गावठी कट्टा घेऊन येत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांना मिळाली.
त्यांनी उपनिरीक्षक जितेंद्र वाल्टे, पोहेकॉ. विष्णू बिन्हाडे, दीपक माळी, रवींद्र पाटील, विलेश
रावसाहेब पाटील यांना कारवाईच्या सूचना दिल्या. पथकाने दुचाकीवरून (क्र. एमएच १९, एस ९४५०) येणाऱ्या राहुल पावरा व गणपत किर्तने यांना अटक केले.
त्यांच्याकडून गावठी कट्टा, पाच जिवंत काडतूस, दुचाकी आणि दोन मोबाइल असा एकूण ६९ हजार रुपये किमतीचा ऐवज जप्त केला.