logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

दिपक शिवाजी कायंदे यांना 'मॅजिक बुक ऑफ रेकॉर्ड' तर्फे मानद डॉक्टरेट पदवी जाहीर

दिपक शिवाजी कायंदे यांना 'मॅजिक बुक ऑफ रेकॉर्ड' तर्फे मानद डॉक्टरेट पदवी जाहीर
बुलढाणा (प्रतिनिधी):
नॅशनल अँटी करप्शन अँड ऑपरेशन कमिटी ऑफ इंडियाचे (National Anti Corruption & Operation Committee of India) बुलढाणा जिल्हा युवा संरक्षण प्रमुख श्री. दिपक शिवाजी कायंदे यांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीची आणि अविरत कार्याची दखल घेऊन 'मॅजिक बुक ऑफ रेकॉर्ड' (Magic Book of Record) समितीद्वारे त्यांना सन्माननीय 'मानद डॉक्टरेट पदवी' (Honorary Doctorate Award) देऊन गौरविण्यात येणार आहे.
श्री. कायंदे यांनी सामाजिक कार्यात स्वतःला झोकून दिले असून, समाजाप्रती असलेली त्यांची निष्ठा आणि उत्कृष्ट कार्याची दखल राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली आहे. त्यांच्या सकारात्मक दृष्टिकोनामुळे आणि निस्पृह सेवेमुळे समाजातील विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
समितीने पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, श्री. कायंदे यांचे समाजासाठीचे योगदान अमूल्य असून त्यांचे कार्य इतरांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून आनंद व्यक्त केला जात असून लवकरच एका गौरव सोहळ्यात त्यांना ही पदवी प्रदान केली जाणार आहे.
या सन्मानाबद्दल दिपक कायंदे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, हा सन्मान माझ्या एकट्याचा नसून मला साथ देणाऱ्या सर्व हितचिंतकांच्या प्रेमाचा आणि शुभेच्छांचा हा परिपाक आहे. श्री. कायंदे यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

117
5157 views

Comment