हरदोली येथे २० एप्रिलला 'सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन
माजी सरपंच सदाशिव ढेंगे यांचा स्तुत्य सामाजिक उपक्रम
हरदोली येथे २० एप्रिलला 'सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन
माजी सरपंच सदाशिव ढेंगे यांचा स्तुत्य सामाजिक उपक्रम
विलास केजरकर भंडारा.
भंडारा : बेरोजगार संस्था' व 'सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा समिती' यांच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सेवा हीच ईश्वर भक्ती' या उक्तीचा प्रत्यय देणारा एक आदर्श सामाजिक उपक्रम मोहाडी तालुक्यातील हरदोली (झं) येथे पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. येथील माजी सरपंच सदाशिव शिवाजी ढेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली २० एप्रिल २०२६ रोजी 'सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा' भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आले आहे. या सोहळ्यात गरीब व गरजू कुटुंबांसाठी हा विवाह सोहळा पूर्णपणे नि:शुल्क ठेवण्यात आला आहे.
मोहाडी तालुक्यातील हरदोली (झं) येथील लबान तांडा स्टेडियम येथे सोमवार दिनांक २० एप्रिल २०२६ ला सायंकाळी ६.१५ वाजता हा मंगल सोहळा संपन्न होणार आहे.
या उपक्रमाचे प्रमुख संयोजक तथा माजी सरपंच सदाशिव शिवाजी ढेंगे यांनी वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षापासून समाजसेवेची वाट धरली. सरपंच पदावर कार्यरत असतांना त्यांनी ग्रामपंचायतीला अनेक नाविन्यपूर्ण उपक्रमांमुळे विविध पुरस्कार मिळवून दिले. त्याच काळात त्यांनी सुरू केलेल्या सामूहिक विवाह सोहळ्याची परंपरा आजही अविरत सुरू आहे. कोरोना काळाचा अपवाद वगळता या सामाजिक उपक्रमाने आठ यशस्वी वर्षांचा टप्पा पार केला असून यंदाचे दहावे वर्ष ठरणार आहे. २०१८ पासून आजपर्यंत या सामूहिक विवाह उपक्रमातून ६८ गरीब व गरजू मुलींचे कन्यादान करण्यात आले आहे. आर्थिक अडचणींमुळे विवाह कार्यात अडथळे येणाऱ्या कुटुंबांसाठी हा सोहळा मोठा दिलासा ठरत आहे. यंदाही विवाहात सहभागी होणाऱ्या जोडप्यांना संसारासाठी आवश्यक पाच भांडी व इतर साहित्य भेट देण्यात येणार आहे. तसेच उपस्थित पाहुण्यांसाठी गोड जेवण व सुलभ बैठकीची व्यवस्था करण्यात येणार आहे.
या उपक्रमासाठी समिती सदस्य पंढरीनाथ झंझाड, गजानन इलमे, इंजि. राहुल बुरडे, गुणवंत झंझाड, नाना झंझाड, संजय झंझाड, मोरेश्वर झंझाड, राजेश बुरडे, मानिक शेडे, दिगांबर झंझाड, महेंद्र झंझाड, नाणेश्वर माटे, मोरेश्वर माटे, विलास झंझाड, विक्रम गायधने, ओमराज बांते, राजू झंझाड, मदन बावणे, विक्रम डोबणे, अजय झंझाड, रवींद्र सोनटक्के, युवराज झंझाड, नवीन झंझाड, अत्ल फेंडर, गोलू माटे, विनोद जगनाडे, राजकुमार कुर्वेकर, कैलास धांडे, शशिकांत गायधने, शशिकांत झंझाड, धनलाल कंगाले, रामभाऊ बांते, दिनेश बांते, शुभम घोनमोडे, लक्समिकांत सार्वे, पराग झंझाड, नरेश झंझाड, नीलकंठ कुकडे, युवराज झंझाड राजकुमार बुराडे गोकुळ गायधने, रामा झंझाड, गुणवंत बुरडे, मंगल झंझाड व अन्य कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.
शिवाजी सुशिक्षित व कुटुंबातील मुला-मुलींचे लग्न थाटात लावून देणे आणि हजारो लोकांचे आशीर्वाद त्यांना मिळवून देणे, यातच खरे समाधान आहे. ही सामाजिक परंपरा आम्ही पुढील काळातही कायम ठेवणार आहोत.
*सदाशिव शिवाजी ढेंगे, संयोजक सामूहिक विवाह सोहळा समिती हरदोली*
*Devashish Govind Tokekar*
*VANDE Bharat live tv news Nagpur*
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
*Indian Council of press,Nagpur*
Journalist Cell
*All India Media Association
Nagpur*
*District President*
*Delhi Crime Press*
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
*INDIAN PRESS UNION*
District Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015