logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

नाशिक येथे आदिवासी शिक्षक संघटनेची बैठक उत्साहात संपन्न


नाशिक, दि. १८ एप्रिल २०२६ (शनिवार) : महाराष्ट्र राज्य आदिवासी प्राथमिक शिक्षक संघटना, मनपा शाखा नाशिक यांच्या वतीने आयोजित बैठक मा. श्री निवृत्ती तळपाडे (मामा) सर यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.
या बैठकीस राज्य सरचिटणीस मा. श्री मोतीराम पवार सर, मा. श्री धर्मेंद्र बागुल सर, मा. श्री आवारी सर, मा. श्री भोये सर, मा. श्री देशीराम चव्हाण सर, मा. श्री बांगर सर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच संघटनेचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी राज्याध्यक्ष मा. श्री तळपाडे मामा सर, राज्य सरचिटणीस मा. श्री मोतीराम पवार सर तसेच ९१ दिवसांची नर्मदा परिक्रमा पूर्ण करून परतलेले मा. श्री देशीराम चव्हाण सर यांचा संघटनेतर्फे भव्य सत्कार करण्यात आला.
बैठकीदरम्यान राज्याध्यक्ष व राज्य सरचिटणीस यांनी संघटना अधिक बळकट करण्यासाठी सर्व शिक्षकांनी एकजुटीने कार्य करण्याचे आवाहन केले. यावेळी श्री मुठे सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री युवराज ठाकरे सर, श्री सुनील गावित सर, श्री मधुकर देसाई सर, श्री कृष्णा महाले सर, श्री सुभाष भोये सर, श्री चौधरी सर, श्री तळपे सर, श्री चौरे सर, श्री आहेर सर, श्री पालवी सर, श्री गावित सर, श्री जालिंदर ठाकरे सर, श्री बेंडकोळी सर आदी शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले.

48
2861 views

Comment