गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे संतप्त नागरिकांनी रोखला महामार्ग
डॉ. यशवंत लांजेवार यांच्या प्रयत्नांमुळे वाटप केले ३२० अतिरिक्त सिलेंडर
गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे संतप्त नागरिकांनी रोखला महामार्ग
डॉ. यशवंत लांजेवार यांच्या प्रयत्नांमुळे वाटप केले ३२० अतिरिक्त सिलेंडर
विलास केजरकर भंडारा
भंडारा. शनिवार, १८ एप्रिल २०२६ ला खात रोडवरील खोकरला गुर्जर गॅस एजन्सीसमोर गॅस सिलेंडरच्या तुटवड्यावरून मोठ्या संख्येने नागरिकांनी आपला संताप व्यक्त केला. सिलेंडरच्या दीर्घकाळापासूनच्या अनुपलब्धतेमुळे लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी पसरली होती, जी आज उफाळून आली.
संतप्त नागरिकांनी रस्ता अडवल्याने परिस्थिती चिघळली, ज्यामुळे वाहतूक तात्पुरती विस्कळीत झाली आणि परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.
डॉ. लांजेवार यांनी परिस्थितीचा ताबा घेतला.
घटनेची माहिती मिळताच नंदगोपाल फाऊंडेशनचे संस्थापक उपाध्यक्ष डॉ. यशवंत लांजेवार हे आपल्या कार्यकर्त्यांसह घटनास्थळी पोहचले. त्यांनी तात्काळ भंडारा येथील जिल्हा पुरवठा अधिकारी नरेश वंजारी यांच्याशी संपर्क साधून त्यांना नागरिकांच्या समस्येची माहिती दिली आणि त्वरित तोडगा काढण्याची मागणी केली. मात्र परिस्थिती अथिकच चिघडल्याने नागरिकांनी अख भंडारा ते रामटेक महामार्ग सिलेंडर च्या सहाय्याने बंद केले होते.
घटनेची माहिती मिळताच भंडारा पोलीस स्टेशनचे (शहर विभाग) निरीक्षक, वाहतूक विभाग व सुरक्षा अतिरिक्त तुकडी ला प्राचारण करण्यात आले. आणि चार तासांच्या कालावधीनंतर डॉ. यशवंत लांजेवार यांच्या प्रयत्नांनंतर, पुरवठा विभागाने तात्काळ ३२० अतिरिक्त सिलिंडर पुरवण्याचे आदेश दिले. यामुळे परिस्थिती नियंत्रणात आली आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळाला.
उत्सवापूर्वी दिलासा
अक्षय तृतीयेच्या महत्त्वाच्या सणाच्या अगदी आधी ही समस्या उद्भवली. वेळेवर झालेल्या निराकरणामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आणि त्यांनी प्रशासनाच्या कारवाईचे कौतुक केले.
पोलीस व्यवस्था आणि सुव्यवस्था: कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता, ज्यामुळे कोणतीही अनुचित घटना टळली.
मानवतेचा परिचय
या दरम्यान, नंदगोपाल फाऊंडेशनने आंदोलनस्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली. लोकांनी या उपक्रमाचे कौतुक केले.
त्यावेळी सरीन भोयर, भोजराज गौतम, हेमराज ठाकरे, विलास केजरकर, समीर नवाज, मनीषा भांडारकर आणि भावेश बावनकुळे या संपूर्ण प्रयत्नांना पाठिंबा देणाऱ्या कार्यकर्त्यांचे नागरिकांनी विशेषत: आभार मानले.
*Devashish Govind Tokekar*
*VANDE Bharat live tv news Nagpur*
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
*Indian Council of press,Nagpur*
Journalist Cell
*All India Media Association
Nagpur*
*District President*
*Delhi Crime Press*
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
*INDIAN PRESS UNION*
District Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015