आश्वासने उपोषणकर्त्याचे आंदोलन मागे
आश्वासने उपोषणकर्त्याचे आंदोलन मागे
विलास केजरकर भंडारा.
भंडारा:- शिवाजी महाराज शेतकरी-शेतमजूर संघटनेचे अध्यक्ष मनोज पटले रा. परसोडी यांनी धान्य खरेदी मिलिट वाढ करण्याच्या मागण्यांसाठी दिनांक १३ एप्रिल २०२६ पासून उपोषण केले होते.
या उपोषणादरम्यान त्यांच्या विविध मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली. धान्य खरेदी मिलिट वाढ चा प्रश्न जिल्हाचा राज्य शासन दरबारी मार्गी काढण्याचा आश्वासन आमदार परिणय फुके यांनी दिल्या नंतर भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष आशुभाऊ गोंडाणे, किसान आघाडी अध्यक्ष अविनाश ब्राह्मणकर तसेच तहसीलदार श्रीमती शितल धावते यांनी संबंधित मागण्यांबाबत आश्वासन दिल्यानंतर मनोज पटले यांना नारळ पाणी देऊन उपोषणाची सांगता करून घेतली.
त्यावेळी जिल्हाध्यक्ष आशुभाऊ गोंडाणे, किसान आघाडी अध्यक्ष अविनाश ब्राह्मणकर, ओबीसी मोर्चा अध्यक्ष श्रीकांत भुसारी, तहसीलदार श्रीमती शितल धावते, माजी उपसभापती गिरीशजी बावनकुळे, लाखनी ग्रामीण तालुका अध्यक्ष घनश्याम मते, तालुका अध्यक्ष भुमेश ढेंगे, शहर अध्यक्ष महेश आकरे, लाखनी नगरसेवक संदीप भांडारकर, माजी तालुका अध्यक्ष श्रावण कापगते, पुरवठा निरीक्षक रोशन कापसे, सुधाकर हटवार, अशोक पटले, धनराज पारधीकर, ज्ञानेश्वर येळेकर व इत्यादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थित सर्व मान्यवरांनी शेतकरी-शेतमजूरांच्या प्रश्नांबाबत सकारात्मक तोडगा काढण्यासाठी प्रशासन सहकार्य करेल असा विश्वास व्यक्त केला.
*Devashish Govind Tokekar*
*VANDE Bharat live tv news Nagpur*
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
*Indian Council of press,Nagpur*
Journalist Cell
*All India Media Association
Nagpur*
*District President*
*Delhi Crime Press*
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
*INDIAN PRESS UNION*
District Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015