logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

आज मासिक जनजागर सांगता सोहळा अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर विधिवत भूमिपूजनाचे आयोजन


आज मासिक जनजागर सांगता सोहळा


अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर विधिवत भूमिपूजनाचे आयोजन

अमळनेर प्रतिनिधी: शेतजमिनीचा पोत सुधारण्यासह सुजलाम्-सुफलाम् शेतीसाठी वर्ष प्रतिपदा अर्थात गुढीपाडव्याचे औचित्य साधून गेल्या १९ मार्च २०२६ रोजी विविध मंत्री महोदयांसह शेतकऱ्यांच्या साक्षीने शुभारंभ करण्यात आलेल्या ‘भूमी सुपोषण अभियान’ या राष्ट्रीय चळवळ जनजागराला उद्या, रविवार, दि. १९ एप्रिल रोजी अक्षय्य तृतीयेच्या पवित्र मुहूर्तावर एक महिना पूर्ण होत आहे. या निमित्ताने श्री मंगळग्रह मंदिर परिसरात सकाळी ८ वाजता या अभियानाचा मासिक जनजागर सांगता सोहळा आयोजित करण्यात आला आहे. अक्षय कृषी परिवार आणि मंगळग्रह सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या सांगता सोहळ्यास प्रांताधिकारी मयूर भंगाळे, तहसीलदार रूपेशकुमार सुराणा, डीवायएसपी विनायक कोते, पालिकेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे, उपविभागीय कृषी अधिकारी साठे, तालुका कृषी अधिकारी ठाकरे, अमळनेर तालुक्यातील कृषी क्षेत्रातील विविध पुरस्कारप्राप्त गणमान्य व्यक्ती सतीश निंबाजी काटे (कोळपिंप्री), भाऊगीर धुडकूगीर गोसावी( नगाव), सौ. पुष्पलता साहेबराव पाटील (राजवड), सुरेश पिरन पाटील, श्रीमती राजश्री राजेश पाटील या महानुभवांसह तालुक्यातील शेतकरी उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी होणाऱ्या भव्य-दिव्य भूमिपूजन कार्यक्रमासाठी अमळनेर तालुक्यासह विविध गावांतील शेतकऱ्यांनी आपापल्या शेतांतून एक मूठ माती सोबत आणावी. ही माती एकत्रित करून तिचे विधिवत पूजन आपल्या सर्वांच्या साक्षीने केले जाणार आहे. त्यानंतर ही विधिवत अभिमंत्रित केलेली माती आपापल्या गावी परत नेऊन आपापल्या शेतात टाकावयाची आहे. त्यासोबतच भूमी सुपोषणाच्या या परमपवित्र कार्याचा स्वतःसह इतरांनाही जागर करण्यासाठी अभियानात सहभागी करावयाचे आहे. याकरिता सर्व महानुभवांसह शेतकऱ्यांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन मंगळग्रह सेवा संस्था, अमळनेर यांच्यातर्फे करण्यात आले आहे.
.......

1
99 views

Comment