*पोटच्या 13|| वर्षाच्या लेकीवर नराधम पित्याचा वारंवार अत्याचार; हॉटेल चालकाचाही अत्याचार...*
*पोटच्या 13|| वर्षाच्या लेकीवर नराधम पित्याचा वारंवार अत्याचार; हॉटेल चालकाचाही अत्याचार...*
अहिल्यानगर (शिवप्रहार न्यूज)- जामखेड तालुक्यात बाप-लेकाच्या पवित्र नात्यालाच तडा देणारी संतापजनक घटना उघडकीस आली आहे.अवघ्या साडेतेरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर तिच्याच जन्मदात्या पित्याने तसेच एका हॉटेलचालकाने अत्याचार केल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले असून पीडिता ०३ महिन्यांची गर्भवती असल्याचे वैद्यकीय तपासणीत स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी जामखेड पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक करून त्यांच्यावर पोक्सो आणि बलात्काराचे गुन्हे दाखल केले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार,ऑक्टोबर २०२५ मध्ये दिवाळीच्या सुट्टीदरम्यान ती आजी-आजोबा आणि वडिलांसोबत ऊसतोडणीसाठी जामखेड तालुक्यातील सरदवाडी परिसरात आली होती.याच काळात पाणी भरण्यासाठी हॉटेलवर जात असताना आरोपी जयदत्त सदाशिव कात्रजकर उर्फ नाना याने तिला जवळच्या शेतात नेऊन वारंवार अत्याचार केला.या प्रकाराची कुणाला माहिती दिल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली.यानंतर नोव्हेंबर २०२५ मध्ये कुटुंब बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील सांगवी येथे ऊसतोडणीसाठी गेले असता तिथेच पीडितेच्या जन्मदात्या पित्याने नोव्हेंबर २०२५ ते मार्च २०२६ या कालावधीत तिच्यावर अनेकवेळा अत्याचार केल्याचे तपासात समोर आले.
दरम्यान, एप्रिल २०२६ मध्ये वार्षिक परीक्षेसाठी पीडिता आश्रमशाळेत परतली असता शाळेकडून आरोग्य तपासणी करण्यात आली.०९ एप्रिल रोजी झालेल्या वैद्यकीय तपासणीत ती तीन महिन्यांची गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले आणि संपूर्ण प्रकार उघडकीस आला. यानंतर संगमनेर पोलिसांनी तत्काळ जामखेड पोलिसांशी संपर्क साधत पुढील कारवाई सुरू केली. सपोनि.वर्षा जाधव यांनी पीडितेला विश्वासात घेऊन सखोल चौकशी केली असता या अमानुष अत्याचाराची धक्कादायक मालिका समोर आली.
पूर्वी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्याचा कार्यभार सांभाळलेले व सध्याचे जामखेडचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने १४ एप्रिल रोजी रात्री दोन्ही आरोपींना अटक केली. न्यायालयाने आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीणचंद लोखंडे करीत आहेत.
*Devashish Govind Tokekar*
*VANDE Bharat live tv news Nagpur*
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
*Indian Council of press,Nagpur*
Journalist Cell
*All India Media Association
Nagpur*
*District President*
*Delhi Crime Press*
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
*INDIAN PRESS UNION*
District Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015