*चारित्र्याच्या संशयावरून हातोड्याने बायकोचा खून करणाऱ्याला जन्मठेप*....
*चारित्र्याच्या संशयावरून हातोड्याने बायकोचा खून करणाऱ्याला जन्मठेप*....
कोपरगाव (*शिवप्रहार न्यूज*)- कोपरगावला हादरवून सोडणाऱ्या निघृण हत्याकांडाचा अखेर निकाल लागला आहे.चारित्र्याच्या संशयावरून आपल्याच पत्नीची हातोड्याने निघृण हत्या करणाऱ्या नराधम पतीला कोपरगाव जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची मरेपर्यंत कारावासाची शिक्षा सुनावली. अरुण रतन दाभाडे असं या आरोपीचे नाव असून न्यायाधीश डी. डी. अलमले यांनी आरोपीला ५ हजार रुपये दंडासह ही कठोर शिक्षा ठोठावली आहे.
या सुन्न करणाऱ्या हत्याकांडाची घटना १९ फेब्रुवारी २०२४ ला घडली होती.मयत महिला ही दुपारी सव्वा दोनच्या सुमारास कोपरगाव येथील आचारी हॉस्पिटलमधून जेवण करण्यासाठी जेऊर पाटोदा येथील घराकडे पायी जात होती. त्याचवेळी वाटेत दबा धरून बसलेल्या अरुण रतन दाभाडे याने चारित्र्यावरील संशयाच्या कारणाने तिच्यावर हल्ला चढवला.सोबत आणलेल्या लोखंडी हातोड्याने सपासप वार करून तिला जागीच ठार मारले होते. या घटनेने संपूर्ण कोपरगाव तालुका हादरून गेला होता.कोपरगाव शहर पोलिसांनी या प्रकरणी अत्यंत गांभीर्याने तपास चक्र फिरवली होती. तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पावरा यांनी या घटनेचा पंचनामा आणि पुराव्यांचे संकलन करून दोषारोपपत्र दाखल केले.
सरकारी वकील शरद गुजर यांनी सरकारी पक्षातर्फे युक्तिवाद करताना १२ महत्त्वाच्या साक्षीदारांची साक्ष नोंदवली. यामध्ये प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आणि वैद्यकीय पुराव्यांनी आरोपीचा गुन्हा सिद्ध करण्यात मोलाची भूमिका बजावली.दोन वर्षांच्या आत या प्रकरणाचा तपास, साक्षी- पुरावे आणि अंतिम निकाल लागल्याने न्यायालयीन प्रक्रियेबाबत नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. या खटल्यात महिला फौजदार नंदा गलांडे, पोलीस कॉन्स्टेबल सुभाष माळी, फटांगरे आणि वर्पे यांनी पैरवी अधिकारी म्हणून महत्त्वाची भूमिका पार पाडली.
*Devashish Govind Tokekar*
*VANDE Bharat live tv news Nagpur*
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
*Indian Council of press,Nagpur*
Journalist Cell
*All India Media Association
Nagpur*
*District President*
*Delhi Crime Press*
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
*INDIAN PRESS UNION*
District Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015