logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

आता काही पेंडिंग नाही…” देवेंद्र फडणवीसांची दिल्लीवारी’वरून मिश्किल टिप्पणी; सरसंघचालकांसमोर नेमकं काय घडलं ? सरसंघचालक मोहन भागवत, मुख्यमंत्री आणि उप

आता काही पेंडिंग नाही…” देवेंद्र फडणवीसांची दिल्लीवारी’वरून मिश्किल टिप्पणी; सरसंघचालकांसमोर नेमकं काय घडलं ?
सरसंघचालक मोहन भागवत, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत रंगली राजकीय चर्चा.पुणे : सरसंघचालक मोहन भागवत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर देवेंद्र फडणवीस यांचे नाव दिल्लीत गाजणार, असे भाकीत पुण्यातील एका कार्यक्रमात वर्तविण्यात आले अन् उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करत दाद दिली.लता मंगेशकर मेडिकल फाउंडेशनच्या वतीने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते ‘लता-आशा मंगेशकर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस’चे भूमिपूजन गुरुवारी करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महापौर मंजुषा नागपुरे, विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, फाउंडेशनचे अध्यक्ष पंडित हृदयनाथ मंगेशकर, विश्वस्त उषा मंगेशकर, आनंद भोसले, आदिनाथ मंगेशकर, लता मंगेशकर फाउंडेशनचे वैद्यकीय संचालक डॉ. धनंजय केळकर आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमात फाउंडेशनचे वैद्यकीय संचालक डॉ. धनजंय केळकर यांनी लता-आशा मंगेशकर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसच्या उभारणीचे टप्पे, सुविधा आणि फाउंडेशनच्या कार्याचा आढावा सादर केला. त्यावेळी केळकर यांनी रुग्णालयात आलेले प्रमुख पाहुणे आणि घडणाऱ्या योगायोगाचा संदर्भ देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नावही देशाच्या राजकारणात. दिल्लीत गाजणार, असे भाकीत वर्तवले. कार्यक्रमाला आलेल्या उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करत धनंजय केळकर यांनी केलेल्या विधानाला दाद
“आता काही पेंडिंग नाही…” देवेंद्र फडणवीसांची दिल्लीवारी’वरून मिश्किल टिप्पणी; सरसंघचालकांसमोर नेमकं काय घडलं ?
सरसंघचालक मोहन भागवत, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत रंगली राजकीय चर्चा.
पुण्यात 'लता-आशा मंगेशकर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस'च्या भूमिपूजन प्रसंगी सरसंघचालक मोहन भागवत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.(छायाचित्र - लोकसत्ता टीम)
पुणे : सरसंघचालक मोहन भागवत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर देवेंद्र फडणवीस यांचे नाव दिल्लीत गाजणार, असे भाकीत पुण्यातील एका कार्यक्रमात वर्तविण्यात आले अन् उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करत दाद दिली.

लता मंगेशकर मेडिकल फाउंडेशनच्या वतीने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते ‘लता-आशा मंगेशकर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस’चे भूमिपूजन गुरुवारी करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महापौर मंजुषा नागपुरे, विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, फाउंडेशनचे अध्यक्ष पंडित हृदयनाथ मंगेशकर, विश्वस्त उषा मंगेशकर, आनंद भोसले, आदिनाथ मंगेशकर, लता मंगेशकर फाउंडेशनचे वैद्यकीय संचालक डॉ. धनंजय केळकर आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमात फाउंडेशनचे वैद्यकीय संचालक डॉ. धनजंय केळकर यांनी लता-आशा मंगेशकर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसच्या उभारणीचे टप्पे, सुविधा आणि फाउंडेशनच्या कार्याचा आढावा सादर केला. त्यावेळी केळकर यांनी रुग्णालयात आलेले प्रमुख पाहुणे आणि घडणाऱ्या योगायोगाचा संदर्भ देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नावही देशाच्या राजकारणात. दिल्लीत गाजणार, असे भाकीत वर्तवले. कार्यक्रमाला आलेल्या उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करत धनंजय केळकर यांनी केलेल्या विधानाला दाद दिली.


हेही वाचा
लॉजवर सुरू असलेल्या देहविक्री व्यवसायाचा पर्दाफाश; बांगलादेशी महिलेसह ९ महिलांची सुटका
डॉ. केळकर म्हणाले, ‘दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला अनेक नामवंतांचे आशीर्वाद लाभले. देशाचे दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, दिवंगत राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, शरद पवार, अमिताभ बच्चन असे प्रमुख पाहुणे लता मंगेशकर फाउंडेशनच्या विविध कार्यक्रमांना लाभले. या सर्व कार्यक्रमांना प्रमुख पाहुणे म्हणून आलेले व्यक्तींनी मोठी प्रगती केली. देशाच्या सर्वोच्च पदापर्यंत हे मान्यवर पोहचले.’

‘माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी पहिल्यांदा दीनानाथला आले, तेव्हा ते विरोधी पक्षनेते होते. पण, त्यानंतर ते देशाचे पंतप्रधान झाले. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम दीनानाथला आले तेव्हा ते प्रसिद्ध शास्त्रज्ञ होते. पुढे ते देशाचे राष्ट्रपती झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना पहिल्यांदा दीनानाथला आले. ते सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून आपला कार्यकाळ पूर्ण करतील. याच परंपरेने आता प्रमुख पाहुणे म्हणून आलेले देवेंद्र फडणवीस यांचे नावही दिल्लीत गाजेल,’ असा विश्वास डॉ. धनंजय केळकर यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उत्तर
डॉ. धनंजय केळकर यांनी मांडलेला हा ‘राजकीय योगायोग’ आणि सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासमोर केलेले देवेंद्र फडणवीसांच्या भविष्यातील ‘दिल्ली वारी’च्या विधानाला उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करत दाद दिली. तर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सावध पवित्रा घेत डॉ. केळकर यांच्या विधानाला उत्तर दिले. ‘ज्या कार्यक्रमाला गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी आलेले, त्याच कार्यक्रमात मी भाजपचा प्रदेशाध्यक्ष म्हणून उपस्थित होते. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले आणि मी मुख्यमंत्री. त्याच वेळी मलाही संस्थेचे आशीर्वाद मिळाले. आता काही पेंडिंग नाही,’ अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी डॉ. केळकर यांच्या विधानामुळे निर्माण झालेल्या चर्चेच्या शक्यतांना पूर्णविराम दिला.

0
24 views

Comment