*मुलींमध्ये होणारा गर्भाशयाचा कर्करोग रोखण्यासाठी एक महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहे.*
नांदेड (प्रतिनिधी) – *मुलींमध्ये होणारा गर्भाशयाचा कर्करोग रोखण्यासाठी एक महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात येत असून भारतीय जनता पक्ष, लायन्स क्लब, अमरनाथ यात्रेकरू संघ तसेच मनपा यांच्या संयुक्त विद्यमाने १४ ते १५ वर्षे वयोगटातील मुलींसाठी मोफत एचपीव्ही लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर शुक्रवार दि. १७ एप्रिल रोजी सकाळी ९ ते ११ या वेळेत शिवशक्तीनगर, नांदेड येथे पार पडणार असल्याची माहिती धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांनी दिली.*
खा. अशोकराव चव्हाण, खा. डॉ. अजित गोपछडे, प्रदेश उपाध्यक्ष संजय कोडगे व चैतन्य देशमुख, माजी पालकमंत्री डी. पी. सावंत, भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ. संतुकराव हंबर्डे व ॲड. किशोर देशमुख, महापौर कविता मुळे, उपमहापौर दीपकसिंह रावत, सभागृह नेते ॲड. महेश कनकदंडे,लायन्स उपप्रांतपाल योगेश जायस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबीर घेण्यात येत आहे.
महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणारी एचपीव्ही (ह्युमन पॅपिलोमा व्हायरस) लसीकरण मोहीम ही मुलींमध्ये होणाऱ्या गर्भाशयाच्या कर्करोगाच्या प्रतिबंधासाठी अत्यंत महत्त्वाची ठरत आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिन, ८ मार्च २०२६ पासून सुरू झालेल्या या मोहिमेचा मुख्य उद्देश मुलींना एचपीव्ही विषाणूपासून संरक्षण देऊन भविष्यातील महिलांचे आरोग्य सुरक्षित करणे हा आहे.
या मोहिमेत विशेषतः १४ वर्षे पूर्ण झालेल्या आणि १५ वर्षे न झालेल्या मुलींना प्राधान्य देण्यात आले असून त्यांना गार्डासिल-४ ही लस मोफत दिली जात आहे. ही लस एचपीव्ही चे प्रकार १६ आणि १८ पासून संरक्षण देते, जे गर्भाशयाच्या कर्करोगासाठी सुमारे ७० टक्के जबाबदार मानले जातात. या लसीचा एकच डोस देण्यात येतो आणि तो पूर्णपणे सुरक्षित व प्रभावी असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.
राज्यात सुमारे ९.८४ लाख मुलींना लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून ही मोहीम मिशन मोडमध्ये तीन महिन्यांच्या कालावधीत राबविण्यात येत आहे. पुढे ही लस नियमित लसीकरण कार्यक्रमात समाविष्ट करण्याचा मानस आहे.लसीकरण पूर्णपणे मोफत उपलब्ध आहे. यू-विन पोर्टलच्या माध्यमातून नोंदणी करण्यात येते आणि लसीकरणानंतर डिजिटल प्रमाणपत्र दिले जाते.एचपीव्ही हा मुख्यतः लैंगिक संपर्कातून पसरणारा विषाणू असून तो गर्भाशयाच्या कर्करोगाचे प्रमुख कारण मानला जातो. त्यामुळे लहान वयात, विषाणूच्या संपर्कापूर्वी ही लस दिल्यास तिचा प्रभाव अधिक चांगला राहतो, असे तज्ज्ञांचे मत आहे.
“एचपीव्ही लस म्हणजे कर्करोगापासून संरक्षण” आणि “एक डोस – आयुष्यभराची सुरक्षा” हा संदेश लक्षात ठेवून पालकांनी कोणतीही भीती न बाळगता आपल्या मुलींना लसीकरणासाठी पुढे आणावे या उपक्रमामुळे मुलींच्या आरोग्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल उचलले जात असून समाजाने या मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा, तसेच या लसीकरण शिबिरासाठी येताना मुलींनी आपले आधार कार्ड सोबत आणणे आवश्यक आहे असे आवाहन ॲड. दिलीप ठाकूर यांनी केले.
*Devashish Govind Tokekar*
*VANDE Bharat live tv news Nagpur*
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
*Indian Council of press,Nagpur*
Journalist Cell
*All India Media Association
Nagpur*
*District President*
*Delhi Crime Press*
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
*INDIAN PRESS UNION*
District Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015