logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

अहेरीत "भीमा तुझ्या जन्मामुळे, उद्धारली कोटी कुळे" विविध उपक्रमांनी भीमजयंती साजरी

अहेरीत "भीमा तुझ्या जन्मामुळे, उद्धारली कोटी कुळे"
@ विविध उपक्रमांनी भीमजयंती साजरी
अहेरी श.....
सामाजिक समतेचे पुरस्कर्ते, भारतीय घटनेचे शिल्पकार तसेच ज्यांच्या जन्मामुळे कोटी कोटी समाजाला अंधारातून प्रकाशाकडे नेणारी वाट शिक्षणाच्या मार्गातून दाखविणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती स्थानिक धम्म दीक्षाभूमी बुद्ध विहार टेकडी, आझाद चौक, दाणसूर चौक येथे विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली.
बायपास रोड टेकडी येथील धम्मदीक्षा भूमी येथे सकाळी ध्वजारोहण, वंदना व मार्गदर्शन पर जनजागृती करण्यात आली. मार्गदर्शनात एड. पंकज दहागावकर यांनी भारतातील सर्व कायदेमंडळ व राज्य सरकारी यंत्रणा संविधानाने चालतात. म्हणून समाजातील प्रत्येक घटकाने संविधानाची जाण ठेवण्याचे आवाहन केले. प्राचार्य विष्णू सोनोणे यांनी बाबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शिक्षण, जाणीव व जीवनात संघर्ष करण्याची तयारी असली पाहिजे असे सांगितले.
मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष शंकर गरगम, उमाजी गोवर्धन, संगीता दुर्गे, प्रियंका मेश्राम, समाजाचे अध्यक्ष डॉ. रतन दुर्गे,बुधाजी सिडम उपस्थित होते.
बोधिसत्व बहुउद्देशीय सामाजिक विकास मंडळ, यशोधरा महिला मंडळ व वंदना मैत्री संघाच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी पाच वाजता विहारापासून मज्जिद चौक, आझाद चौक, गांधी चौक, दानशूर चौकातून मिरवणूक ढोल, ताशे व लेझीमच्या सुरात काढण्यात आली.
स्थानिक आजाद चौकात माजी राज्यमंत्री राजे अमरीशराव महाराज यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेबांना पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. दानशूर चौकात संत शिरोमणी रविदास नगरच्या वतीने विविध रोषणाई करून नागरिकांना थंडपेय व पिण्याच्या पाण्याची सोय करून देण्यात आली होती.
अहेरीत विविध ठिकाणी बॅनरबाजी व विविध उपक्रमांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पानजली वाहण्यात आली.

78
10647 views

Comment