डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार डोक्यात असणे हीच प्रगतीची खरी गुरुकिल्ली - प्रकाश ढगे
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार डोक्यात असणे हीच प्रगतीची खरी गुरुकिल्ली - प्रकाश ढगे
उपअधिक्षक भुमी अभिलेख कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी
विलास केजरकर भंडारा.
भंडारा:- "शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा" हा महामंत्र देणारे महामानव, केवळ भारतासाठीच नव्हे, तर संपूर्ण जगासाठी न्यायाचा आणि समतेचा विचार देणारे बाबासाहेब हे खऱ्या अर्थाने विश्वरत्न आहेत. जगातील सर्वात श्रेष्ठ संविधान देऊन त्यांनी प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला. आज आपण जो मुक्त श्वास घेतोय, तो त्यांच्याच संघर्षाचे फळ आहे. क्रांतिसूर्य म्हणजे अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश पसरवणारा हा क्रांतीसूर्य आजही आपल्याला प्रत्येक संकटात मार्ग दाखवत आहे. "डोक्यावर कोणाचेही छत्र असण्यापेक्षा, डोक्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार असणे हीच प्रगतीची खरी गुरुकिल्ली आहे." असे प्रतिपादन उपअधिक्षक भुमी अभिलेख कार्यालयाचे प्रमुख प्रकाश ढगे यांनी केले.
ते उपअधिक्षक भुमी अभिलेख कार्यालय भंडारा च्या वतीने भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ वी जयंती कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपअधिक्षक भुमी अभिलेख कार्यालयाचे प्रमुख प्रकाश ढगे होते. प्रमुख पाहुणे म्हणून उपअधिक्षक भुमी अभिलेख कार्यालय सहाय्यक संजय रायपुरे, जितेंद्र धुर्वे, अभिलेखापाल खुशाल राखडे, भुमापक विनोद वरठी, गिता मडावी, जाबाज सुस्तमखान पठाण इत्यादी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व मार्ल्यापण करण्यात आले.
उपस्थित मान्यवरांनी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिवनातील विविध मार्मिक प्रसंगावर उदाहरण देऊन मार्गदर्शन केले. व सर्वांना पेढे वितरण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अविनाश रोकडे व प्रास्ताविक संजय रायपुरे यांनी केले तर उपस्थितांचे आभार जितेंद्र धुर्वे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी योगेश दंडारे, विशाल नागदेवे, गिता मडावी, संतोष मिरासे, सुभाष बडगे, कैलास पटले, रामा मेश्राम व उपअधिक्षक भुमी अभिलेख कार्यालय भंडारा च्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
*Devashish Govind Tokekar*
*VANDE Bharat live tv news Nagpur*
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
*Indian Council of press,Nagpur*
Journalist Cell
*All India Media Association
Nagpur*
*District President*
*Delhi Crime Press*
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
*INDIAN PRESS UNION*
District Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015