logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांच्या सोशल मीडियावर भीमजयंती मेसेजमध्ये रामजी बाबा, डॉक्टर उपाधी नामोल्लेख टाळल्याने संतप्त प्रतिक्रिया...

*महादू पवार* पत्रकार, मुंबई 9867906135 ‌. ‌ मुंबई, भारतीय संविधानाचे निर्माते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भीमजयंती निमित्ताने संपूर्ण देशभर आणि जगभर जयंती उत्सव उत्साहात साजरा केला जात आहे, मात्र केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांच्या ऑनलाइन सोशल मीडियावरील शुभेच्छांनी सर्वांनाच अश्चर्यचकित केल्याने सर्वत्र संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. सोशल मीडियावरील डॉक्टर उपाधी, रामजी बाबा नाव टाळलेल्या या शुभेच्छा वायरल झाल्या असून सर्वत्र टीका केली जात आहे. या शुभेच्छांमधून डॉक्टर ही उपाधी आणि रामजी बाबा यांचे नाव गरजेचे असताना गायब केल्याने तीव्र संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. ‌‌. केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांचे सोशल मीडियावर हिंदीमध्ये संपूर्ण देशभर भीमजयंती शुभेच्छा संदेश वायरल झाले आहेत. त्यामध्ये हिंदी,मराठी, इंग्रजी मध्ये दिलेल्या शुभेच्छा मेसेजमध्ये महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या शुभेच्छा देताना भारतरत्न बाबासाहेब भीमराव आंबेडकर असा नामोल्लेख करण्यात आला आहे. मात्र भारतीय संविधानाचे निर्माते महामानव डॉ .भीमराव रामजी आंबेडकर असे नामकरण असताना बाबासाहेब भीमराव आंबेडकर असे ह्या मेसेजमध्ये टाकून बाबासाहेबांचे पिताश्री रामजी बाबा यांचा उल्लेखच टाळला गेल्याने भीमसैनिकांमधून संताप आणि रोष, नाराजी व्यक्त केली जात आहे, एवढेच नव्हे तर बाबासाहेबांची डॉक्टर ही उपाधी असताना ती ही जाणीवपूर्वक गायब केल्याने नक्की समाजात देशात जनतेत काय संदेश दिला जात आहे? अशाही संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत, हा चुकीचा मेसेज वायरल करणाऱ्या संबंधितांवर कडक कारवाई करून तो मेसेज तातडीने हटविण्यात यावा, अशी जोरदार मागणी भीमसैनिक आणि आंबेडकरी चळवळीतील सुज्ञ नागरिक आणि विचारवंतांकडून केला जात आहे, याबाबत केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही, याबाबत रिपब्लिकन पक्षाकडून अद्यापही कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

0
0 views

Comment