logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

*राहुरी शहरात आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भव्य* *आणि दणदणीत उत्सव साजरा झाला.

*राहुरी शहरात आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भव्य* *आणि दणदणीत उत्सव साजरा झाला.

मात्र या सोहळ्याचे खरे शिल्पकार ठरले* *ते म्हणजे ऑटो रिक्षा चालक-मालक संघटना आणि त्यांचे* *दमदार नेतृत्व.*

राहुरी तालुका ऑटो रिक्षा चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष कल्याण तात्या जगधने यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम केवळ उत्सव न राहता संघटनेच्या एकजुटीचा आणि सामाजिक बांधिलकीचा प्रभावी दाखला ठरला. त्यांच्या पुढाकारामुळे संपूर्ण मध्यवर्ती परिसर आंबेडकरी विचारांनी भारावून गेला.
संघटनेने केलेली नियोजनबद्ध तयारी, शिस्तबद्ध आयोजन आणि मोठ्या संख्येने चालक- मालकांची उपस्थिती यामुळे या जयंतीला एक वेगळीच उंची प्राप्त झाली. रिक्षा चालक हा समाजाचा कणा आहे, आणि त्याच कणखर वर्गाने बाबासाहेबांच्या विचारांना दिलेला हा मान विशेष उल्लेखनीय ठरला.
या वेळी अयुबभाई इनामदार मुकुंद जगधने, अन्वर सय्यद, चंद्रकांत वाघचौरे, संतोष वाकचौरे, हरिभाऊ पवार, संजय जगधने, राजू आडागळे, सुनील शेलार, सोमनाथ जगधने यांसह संघटनेचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या उत्साहात सहभागी झाले.
तसेच वंचित बहुजन आघाडी चे जिल्हा महासचिव बाबा साठे आणि इतर मान्यवरांची उपस्थिती लाभली; परंतु या कार्यक्रमाची खरी ताकद आणि ओळख ठरली ती ऑटो रिक्षा चालक-मालक संघटनेची एकजूट आणि अध्यक्ष कल्याण तात्या जगधने यांचे प्रभावी नेतृत्व.
या जयंतीनिमित्त संघटनेने समाजापुढे एक ठोस संदेश दिला—“आम्ही फक्त रस्त्यावरचे चालक नाही, तर सामाजिक परिवर्तनाचे वाहक आहोत.” राहुरीतील हा सोहळा संघटनेच्या ताकदीचा आणि बाबासाहेबांच्या विचारांप्रती असलेल्या निष्ठेचा जाज्वल्य पुरावा ठरला.

*पत्रकार/ चंद्रकांत जगधने*

*Devashish Govind Tokekar*
*VANDE Bharat live tv news Nagpur*
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
*Indian Council of press,Nagpur*
Journalist Cell
*All India Media Association
Nagpur*
*District President*
*Delhi Crime Press*
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
*INDIAN PRESS UNION*
District Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

1
180 views

Comment