logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

जि.परिषद शिक्षकांवर अवैध कामांचा वाढता बोजा; विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम

जि.परिषद शिक्षकांवर अवैध कामांचा वाढता बोजा; विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम
सध्या जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांवर विविध अतिरिक्त आणि अवैध कामांचा प्रचंड बोजा टाकण्यात येत असल्याचे चित्र समोर येत आहे. शैक्षणिक कार्याच्या जोडीला शिक्षकांना BLO (मतदार यादी काम), ऑनलाइन नोंदी, जनगणना तसेच इतर प्रशासकीय कामांमध्ये गुंतवले जात आहे.
या सर्व कामांच्या ओझ्यामुळे शिक्षकांना विद्यार्थ्यांकडे योग्य लक्ष देता येत नसून अध्यापन प्रक्रियेत अडथळे निर्माण होत आहेत. विशेषतः वार्षिक परीक्षांच्या काळातही शिक्षक इतर कामांत व्यस्त असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.
पालक आणि शिक्षणप्रेमींनी या परिस्थितीबाबत नाराजी व्यक्त करत शिक्षकांना केवळ शैक्षणिक कामावर लक्ष केंद्रित करण्याची संधी मिळावी, अशी मागणी केली आहे. तसेच शासनाने शिक्षकांवर टाकण्यात येणाऱ्या अवैध व अतिरिक्त कामांचा पुनर्विचार करून विद्यार्थ्यांच्या हितासाठी योग्य निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
एकूणच, शिक्षकांवरील वाढता कामाचा ताण हा शिक्षण व्यवस्थेसाठी चिंतेचा विषय ठरत असून यावर लवकरात लवकर तोडगा निघणे आवश्यक आहे.

19
700 views

Comment