logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

शेवगाव शहरातील कत्तलखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई 05 आरोपी ताब्यात; 200 किलो गोमांस जप्त, 01 गोवंशीय जनावराची सुटका प्रतिनिधी राविराज

अहिल्यानगर : जिल्ह्यात गोवंशीय जनावरांची बेकायदेशीर कत्तल व गोमांस विक्री रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाने कठोर पावले उचलली असून, त्याअंतर्गत शेवगाव शहरात स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे.
मा. श्री. सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेला जिल्ह्यातील अशा बेकायदेशीर कृत्यांवर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाची स्थापना करण्यात आली.
दिनांक 12 एप्रिल 2026 रोजी पहाटे, शेवगाव शहरात गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ईदगाह मैदानाजवळ छापा टाकण्यात आला. या कारवाईदरम्यान काही इसम गोमांस विक्री करताना आढळून आले.
पोलीस पथकाने तत्काळ कारवाई करत खालील 05 आरोपींना ताब्यात घेतले:
मुनावर अब्बास कुरेशी (वय 48)
अदनान मन्सुर कुरेशी (वय 23)
जावेद अहमद शेख (वय 35)
जाकीर मोहम्मद शेख (वय 40)
जावेद फकीर मोहम्मद शेख (वय 42)
सदर आरोपींकडून एकूण ₹68,500 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्यामध्ये:
200 किलो गोमांस (₹40,000)
01 गोवंशीय जनावर (₹5,000) – सुटका करण्यात आली
वजनकाटा (₹1,000)
02 चाकू, 01 सुरा, 01 कुऱ्हाड, 01 टोचा (₹2,500)
02 मोबाईल (₹20,000)
या प्रकरणी शेवगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 271, 325, 3(5) तसेच प्राणी संरक्षण अधिनियम कलम 5(क) व 9 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शेवगाव पोलीस करत आहेत.
सदर कारवाई मा. पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व अंमलदारांनी यशस्वीरीत्या पार पाडली.
📌 विशेष:
या कारवाईमुळे शेवगाव शहरात बेकायदेशीर कत्तल व गोमांस विक्री करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांकडून पोलीस प्रशासनाचे कौतुक केले जात आहे.

1
1880 views

Comment