चितळे बंधू मिठाईवालेंची गोड बातमी! आता मिठाई बनविताना प्रत्यक्ष पाहा अन् चवही चाखा…
चितळे बंधू मिठाईवाले यांच्या वतीने भोर तालुक्यातील रांजे येथे ‘रां
चितळे बंधू मिठाईवालेंची गोड बातमी! आता मिठाई बनविताना प्रत्यक्ष पाहा अन् चवही चाखा…
चितळे बंधू मिठाईवाले यांच्या वतीने भोर तालुक्यातील रांजे येथे ‘रांजे व्हिजन पार्क’ या अत्याधुनिक उत्पादन प्रकल्पाची उभारणी करण्यात आली
चितळे बंधू मिठाईवालेंची गोड बातमी! आता मिठाई बनविताना प्रत्यक्ष पाहा अन् चवही चाखा… (लोकसत्ता टिम)
पुणे : चितळे बंधू मिठाईवाले यांच्या वतीने भोर तालुक्यातील रांजे येथे ‘रांजे व्हिजन पार्क’ या अत्याधुनिक उत्पादन प्रकल्पाची उभारणी करण्यात आली आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते येत्या १६ एप्रिलला होईल, अशी माहिती चितळे बंधू मिठाईवाले या संस्थेचे भागीदार व चितळे कुटुंबातील चौथ्या पिढीचे प्रतिनिधित्व करणारे इंद्रनील व केदार चितळे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी इंद्रनील चितळे म्हणाले की, हा नवीन, अत्याधुनिक उत्पादन प्रकल्प देशातील तसेच परदेशांतील बाजारपेठांमध्ये आमच्या विस्तार योजनेसाठी आवश्यक असलेल्या उत्पादनाच्या गरजा पूर्ण करेल. पॅक बंद खाद्यपदार्थांच्या क्षेत्रातील जागतिक मानके लक्षात घेऊनच या प्रकल्पाची रचना आणि उभारणी करण्यात आली आहे. सुमारे २५ एकर जागेवर उभारण्यात आलेल्या रांजे व्हिजन पार्कमध्ये मिठाई आणि नमकीनसाठी दोन स्वतंत्र उत्पादन केंद्रांची उभारणी करण्यात आली असून ते कार्यान्वित देखील करण्यात आले आहेत. या उत्पादन केंद्रांची क्षमता दररोज ४० टन मिठाई आणि नमकीनचे उत्पादन करण्याची आहे. रांजे व्हिजन पार्कच्या उभारणीमध्ये आतापर्यंत २५० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे
केदार चितळे म्हणाले की, हे व्हिजन पार्क ग्राहकांना पाहण्यासाठी खुले असेल. एक्सपीरियन्स सेंटरसारख्या संकल्पनेवर आधारित असलेल्या या पार्कमध्ये ग्राहकांना चितळे बंधू मिठाईवाले यांच्या सर्व उत्पादनांना एकाच ठिकाणी पाहता येईल आणि त्यांची चव घेता येईल. तसेच नजीकच्या भविष्यात येथे एका कॅफेचीही योजना आखण्यात आली आहे. या पार्कमध्ये ग्राहकांसाठी निरीक्षण कक्ष उभारण्यात आले आहेत. या सुविधेमुळे उत्पादने कशा प्रकारे संपूर्णतः स्वयंचलित उत्पादन प्रक्रियेच्या माध्यमातून तयार केली जातात हे ग्राहक प्रत्यक्ष पाहू शकतील. लवकरच, ग्राहक या या व्हिजन पार्कला भेट देण्यासाठी संस्थेच्या संकेतस्थळाच्या माध्यमातून नोंदणी करू शकतील.
हेही वाचा
Pune Metro News: पुणेकरांनो, आता मेट्रो स्थानकापर्यंत चालण्याची तयारी ठेवा; वाहनतळाची सुविधा देणे शक्य नसल्याचे ‘महामेट्रो’चे स्पष्टीकरण
आजपर्यंतचा प्रवास मांडणारी भिंत
व्हिजन पार्कमध्ये चितळे बंधू मिठाईवाले यांचा आजवरचा प्रवास दर्शवण्यासाठी तयार करण्यात आलेली १०० मीटर लांबीची विशेष भिंत ग्राहकांसाठी नक्कीच कुतूहलाचा विषय ठरेल. उत्पादन प्रक्रिया प्रत्यक्ष पाहण्यासाठी प्रोत्साहित करणारा हा उपक्रम, आमच्या ग्राहकांच्या पिढ्यानपिढ्यांनी आमच्याशी जोपासलेले विश्वासाचे दृढ नाते अधिकच बळकट करेल, अशी अपेक्षा केदार चितळे यांनी व्यक्त केली.
व्यवसाय विस्तारावभर भर
सध्या चितळे बंधू मिठाईवाले यांच्या वतीने वेगवेगळ्या ४५० पदार्थांचे उत्पादन करण्यात येते. रिटेल स्टोअर, क्विकसर्व्हिस व फाईन डाइन रेस्टॉरंटच्या माध्यमातून ही उत्पादने जास्तीतजास्त ग्राहकांपर्यंत पोहोचावी यावर आमचा भर असेल. आजमितीला आमची उत्पादने देशाच्या १० राज्यांमधील सुमारे १ लाख २५ हजार टच पॉइंटच्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत पोहोचत आहेत. टच पॉइंटची ही संख्या येत्या ३ वर्षात ५ लाखांवर नेण्याची आमची योजना आहे. सध्या निर्यातीतून होणारा व्यवसाय हा सुमारे ८ ते ९ टक्के असून येत्या २ ते ३ वर्षात तो २० टक्क्यांपर्यंत नेण्याचे आमचे उद्दिष्ट आहे, असे इंद्रनील चितळे यांनी नमूद केले.