कळमनुरीत तलवार घेऊन फोटो व्हायरल; आरोपीला अटक, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल*
हिंगोली जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिस प्रशासनान
कळमनुरीत तलवार घेऊन फोटो व्हायरल; आरोपीला अटक, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल*
हिंगोली जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिस प्रशासनाने कडक भूमिका घेतली असून रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा तसेच सर्व पोलीस ठाण्यांना अवैध हालचालींवर तात्काळ आणि कठोर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
या पार्श्वभूमीवर दि. १३ एप्रिल २०२६ रोजी सोशल मीडियावर पेट्रोलिंग करत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला महत्त्वाची माहिती मिळाली. कळमनुरी येथील रेकॉर्डवरील आरोपी सचिन गणेश बोराळे (वय २४, रा. माळी गल्ली, कळमनुरी) याने हातात तलवार घेऊन दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने सोशल मीडियावर फोटो शेअर केला होता.
माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तत्काळ कारवाई करत आरोपीला कळमनुरी शहरातून ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक लोखंडी तलवार जप्त करण्यात आली. या प्रकरणी कळमनुरी पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
हिंगोली पोलीस दलाने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही प्रकारचे अवैध शस्त्र बाळगू नये तसेच शस्त्रांसह फोटो किंवा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करू नयेत. अन्यथा संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.
दरम्यान, हिंगोली पोलिसांकडून गुन्हेगारांच्या हालचालींवर सातत्याने लक्ष ठेवले जात असून सायबर सेलमार्फत सोशल मीडियावर विशेष पेट्रोलिंग सुरू आहे. जिल्ह्यात शांतता आणि सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलिस प्रशासन सज्ज असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
Comments