logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

पुण्यातील धक्कादायक प्रकार; निरीक्षण गृहातून १२ बांगलादेशी महिला पसार २० दिवसानंतर या प्रकाराला वाचा फुटली असून, बांगलादेशी महिलांचा शोध सुरू असल्याची

पुण्यातील धक्कादायक प्रकार; निरीक्षण गृहातून १२ बांगलादेशी महिला पसार
२० दिवसानंतर या प्रकाराला वाचा फुटली असून, बांगलादेशी महिलांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.पुणे : बेकायदा वास्तव्य, तसेच वेश्याव्यवसाय प्रकरणात ताब्यात घेतलेल्या बांगलादेशी महिलांच्या सुरक्षेसाठी निर्माण केलेल्या हडपसर येथील एका संस्थेच्या निरीक्षण गृहातून १२ बांगलादेशी महिला पसार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. निरीक्षण गृहातील कर्मचारी (केअर टेकर) महिलेला बांधून बांगलादेशी महिला पसार झाला. २० दिवसानंतर या प्रकाराला वाचा फुटली असून, बांगलादेशी महिलांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.हडपसर भागातील ससाणे वस्ती परिसरात एका संस्थेकडून निरीक्षण गृह चालविण्यात येते. निरीक्षण गृहात वेगवेगळ्या प्रकरणातील पीडित महिलांना न्यायालयाच्या आदेशाने पाठविण्यात येते. फरासखाना, दिघी, जेजूरी, देहूरोड, कोंढवा पोलिसांनी वेगवेगळ्या कारवाईत बांगलादेशी महिलांना ताब्यात घेतले होते. ताब्यात घेतलेल्या महिला वेश्याव्यवसायात गुंतलेल्या होत्या. त्यांना वेश्याव्यवसायास प्रवृत्त केल्या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. न्यायालयाने १८ मार्च रोजी बांगलादेशी महिलांना बांगलादेशात पाठविण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर बांगलादेशी दूतावासाशी संपर्क साधून त्यांना मायदेशी परत पाठविण्याची तयारी सुरू करण्यात आली होती. न्यायालयाने महिलांची रवानगी निरीक्षण गृहात करण्याचे आदेश दिले होते.

त्यानंतर २३ मार्च रोजी एका बांगलादेशी महिलेने पोटदुखीचा बहाणा करुन कर्मचारी महिलेला बोलाविले. त्यानंतर तिच्याबरोबर असलेल्या अन्य महिलांनी निरीक्षण गृहातील कर्मचारी महिलेचे हात पाय बांधले. निरीक्षण गृहातून त्या पसार झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. बांगलादेशी महिला पसार झाल्याची माहिती संबंधित पोलीस ठाण्यांना कळविण्यात आली. दरम्यान, निरीक्षण गृहात पोलिसांनी सुरक्षाव्यवस्था पुरवावी, अशी मागणी संबंधित संस्थेने केली होती.

0
0 views

Comment