logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

देशगौरव

*जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील वाढोणा गावातिल*
🏹 *आदिवासी भूमीतून उगवलेला सुवर्णतारा – हर्षवर्धन रमेश इंगळे यांची दैदिप्यमान कामगिरी*


जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील आदिवासीबहुल वाढोणा गावातील हर्षवर्धन रमेश इंगळे या तरुणाने
देशातील क्रीडा क्षेत्राला नवी दिशा देण्यासाठी भारताचे पंतप्रधान Narendra Modi यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या Khelo India या महत्त्वाकांक्षी उपक्रमामुळे ग्रामीण व आदिवासी भागातील युवकांना त्यांच्या अंगी असलेल्या सुप्त क्रीडागुणांना वाव मिळत आहे.
या उपक्रमातून अनेक प्रतिभावान खेळाडू घडत असून त्यांनी राष्ट्रीय स्तरावर आपली छाप उमटवण्यास सुरुवात केली आहे.
याच उपक्रमातून महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील वाढोणा या आदिवासी बहुल गावातील सुपुत्र, चिरंजीव हर्षवर्धन रमेश इंगळे यांनी आपल्या अद्वितीय कर्तृत्वाने संपूर्ण जिल्ह्याचा आणि राज्याचा मान उंचावला आहेत
दिल्ली येथे पार पडलेल्या खेलो इंडिया स्पर्धेत त्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले होते. त्यानंतरही त्यांनी आपल्या यशाची परंपरा कायम ठेवत देशातील विविध राज्यांमध्ये झालेल्या स्पर्धांमध्येही सुवर्णपदकांची कमाई करत आपली दमदार ओळख निर्माण केली आहेत
अलीकडेच छत्तीसगड -रायपूर येथे २८ मार्च ते ३ एप्रिल दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या Khelo India Tribal Games या प्रतिष्ठित स्पर्धेमध्ये हर्षवर्धन इंगळे यांनी धनुर्विद्या (आर्चरी) या खेळात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत एकेरी आणि दुहेरी अशा दोन्ही प्रकारांमध्ये सुवर्णपदके जिंकत अभूतपूर्व यश संपादन केले आहेत.
त्यांच्या अचूक लक्ष्यवेध, एकाग्रता आणि कठोर परिश्रमामुळे त्यांनी प्रतिस्पर्ध्यांवर मात करत ही भव्य कामगिरी साकारली असून
हर्षवर्धन इंगळे यांच्या या यशामुळे संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सर्व स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
विशेष म्हणजे त्यांच्या या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत त्यांची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे, ही बाब अत्यंत गौरवास्पद असून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी नवे दालन उघडणारी ठरत आहे.
या यशाबद्दल वाढोणा येथील प्राचार्य गणेश भिकाजी इंगळे, आजोबा भिकाजी इंगळे तसेच त्यांच्या संपूर्ण कुटुंबीय यांनी हर्षवर्धन इंगळे यांचे उत्स्फूर्त स्वागत करून पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या व कोटी कोटी आशीर्वाद दिले आहेत.
त्यांच्या या यशामुळे गावातील तरुणांमध्येही क्रीडाप्रती नवीन प्रेरणा निर्माण झाली आहे.
तसेच अनेक नागरिकांनी हर्षवर्धन रमेश इंगळे यांना एसएमएस, फेसबुक, इंस्टाग्राम, टेलिग्राम तसेच फोनद्वारे व प्रत्यक्ष अप्रत्यक्ष भेट देऊन हर्षवर्धन रमेश इंगळे यांचे अभिनंदन केले.
“अशीच प्रगती करत राहा आणि देशाचे नाव उज्ज्वल करा”
अशा शुभेच्छांचा वर्षाव सर्व स्तरातून होत आहे.
हर्षवर्धन रमेश इंगळे यांची ही उल्लेखनीय कामगिरी केवळ त्यांच्या कुटुंबासाठीच नव्हे तर वाढोणा (ता. भोकरदन) तसेच संपूर्ण जालना जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब ठरली आहे.
आदिवासी भागातूनही जागतिक स्तरावरील खेळाडू घडू शकतात, याचा हा जिवंत पुरावा असून त्यांच्या यशामुळे भविष्यात अनेक युवक प्रेरित होऊन क्रीडा क्षेत्रात पुढे येतील, यात शंका नाही.
अशी माहिती हर्षवर्धन रमेश इंगळे व त्याचे वडील रमेश भिकाजी इंगळे यांनी माहिती दिली आहे

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 *न्यूज रिपोर्टर हरि बोऱ्हाडे ZEE इंडिया२४तास बुलढाणा*

0
12 views

Comment