logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

आदिवासी टायगर सेने चा राज्य सीमापार संघटना विस्ताराचा धडाका – गणेश कोवे यांचे जोमदार नेतृत्व

आदिवासी टायगर सेना व्यापक पातळीवर बळकट होत, सीमापार राज्यात विस्तार.

प्रतिनिधी/आकाश गेडाम

आदिवासी टायगर सेना संघटनेच्या विस्तारासाठी गोंडपिपरी तालुका अध्यक्ष गणेश कोवे यांनी मोठ्या उत्साहात कार्य सुरू ठेवले आहे. महाराष्ट्रातील विठ्ठलवाडा गावातून कार्यरत असताना त्यांनी सीमेलगतच्या तेलंगणा राज्यात जाऊन बाबासागर, कागजनगर येथे आदिवासी बांधवांशी संवाद साधला. या संवादातून नव्या कार्यकर्त्यांची नियुक्ती करण्यात आली असून संघटना विस्ताराला नवी गती मिळाली आहे.
गणेश कोवे यांच्या या धडाडीच्या कामाची दखल घेत आदिवासी टायगर सेनेच्या विदर्भ पदाधिकाऱ्यांनी त्यांचे कौतुक करत पुढील कार्यासाठी प्रोत्साहन दिले. संघटना वाढीसाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांबद्दल त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
सीमापार जाऊन संघटना मजबूत करण्याच्या या उपक्रमामुळे आदिवासी टायगर सेना अधिक व्यापक पातळीवर बळकट होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

3
927 views

Comment