logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

अशा भोसले संगीत विश्वातील एका अविस्मरणीय युगाचा अंत.आशा ताई चे निधन

*'आशा भोसले': संगीत विश्वातील एका 'अविस्मरणीय' युगाचा अंत ! आशाताई भोसले यांचे निधन*

ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांचं आज (रविवार, १२ एप्रिल) निधन झालं. दक्षिण मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या ९२ वर्षांच्या होत्या. शनिवारी प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांची प्रकृती चिंताजनकच होती. रुग्णालयाच्या डॉक्टरांनी आशा भोसले यांच्या निधनाचं कारण सांगितलं. सर्व अवयव निकामी झाल्याने (मल्टी ऑर्गन फेल्युअरमुळे) त्यांचं निधन झाल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केलं. त्यांना मेडिकल प्रॉब्लेम होता, असंदेखील डॉक्टर म्हणाले. आशा भोसले यांच्या पार्थिवावर उद्या (सोमवार) दुपारी ४ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येईल, अशी माहिती आनंद भोसले यांनी दिली. तर सकाळी ११ ते २ दरम्यान लोअर परळ इथल्या त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शन घेता येईल.

. *भावपुर्ण श्रद्धांजली*

🌑🌑🌑🌑🌑🌑🌑

8
442 views

Comment