logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

प्रतिबंधात्मक कारवाईचे अधिकार 'डीवायएसपीं'ना



जळगाव : उपद्रवीच्या कुरघोड्यांना

आळा बसावा, सण-उत्सवप्रसंगी शांतता रहावी, या कारणासाठी करण्यात येणाऱ्या प्रतिबंधात्मक कारवाईचे अधिकार आता उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांना राहणार आहे. तसा प्रस्ताव पाठविला असून अध्यादेश निघाल्यानंतर त्याची अंमलबजावणी होणार आहे. कोणताही सण, उत्सव अथवा अन्य

-

प्रसंगी शांतता रहावी, वाद होऊ नये, यासाठी पोलिसांकडून उपद्रवींवर कारवाई केली जाते. यात कलम १६३ नुसार नोटीस (परिसरात प्रतिबंध करणे) देऊन विशिष्ट कालावधीसाठी त्या-त्या शहरात प्रवेश नाकारला जातो. सध्या ही कारवाई अपर पोलिस अधीक्षकांमार्फत केली जाते. यासाठी त्या-त्या विभागातील उपद्रवींना संबंधित पोलिस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी हे अपर पोलिस अधीक्षकांसमोर हजर करतात. यात एकाच अधिकाऱ्यांकडे कामकाज वाढते व वेळहीं अधिक लागतो. त्यामुळे ही कारवाई उपविभाग स्तरावर झाल्यास अधिकाऱ्यांवरील भारही कमी होईल व संबंधित पोलिस ठाण्याच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा फेराही वाचू शकतो. शिवाय कारवाईचे कामकाज कमी वेळेत होऊ शकते. त्यामुळे डीवायएसपींना प्रतिबंधात्मक कारवाईचे अधिकार देण्याविषयीचा प्रस्ताव गृहविभागाकडे पाठविण्यात आला आहे.

10
262 views

Comment