छोटा हत्ती पकडुन ४,६४,५४०₹ चा मुददेमाल जप्त;श्रीरामपूर अपर पो.अधीक्षक कार्यालयाची कारवाई...
छोटा हत्ती पकडुन ४,६४,५४०₹ चा मुददेमाल जप्त;श्रीरामपूर अपर पो.अधीक्षक कार्यालयाची कारवाई...
श्रीरामपूर/अकोले (*शिवप्रहार न्यूज नेटवर्क*) याबाबत अधिक माहिती अशी की,काल दि.१०/०४/२०२६ रोजी श्री. सोमनाथ वाघचौरे,अपर पोलीस अधीक्षक,श्रीरामपुर यांनी अपर पोलीस अधीक्षक कार्यालयातील पो.हे.कॉ. दादासाहेब लोढे, पो.हे.कॉ.संदीप दरंदले, पो.कॉ.अशोक गाढे, पो.कॉ. राजेंद्र बिरदवडे यांना अकोले पोलीस स्टेशन हददीत अवैध धंदयांवर कारवाई करण्याकरीता आदेशीत केले होते. त्यावरुन अकोले पोलीस स्टेशन हददीत पेट्रोलींग करत असतांना गोपनीय बातमी मिळाली की, अकोले ते धामणगाव पाट जाणारे रोडने एक छोटा हत्तीमध्ये दारुची वाहतुक होणार आहे.पथकाने लागलीच कोतुळ दुरक्षेत्र येथे जावुन तेथील नेमणुकीचे पोहेकॉ/ अनिल जाधव व पोकॉ महेंद्र गुंजाळ तसेच पोहेकॉ जाधव यांनी बोलविले.पंचांसह पोलीस पथक थांबले असता एक पांढरा रंगाचा छोटा हत्ती गाडी क्रं. एम.एच.१७ सी.व्ही. ४१६२ हा अकोले कडुन धामणगाव पाटकडे येत असतांना दिसला.पथकास खात्री होताच सदरचे गाडी बाजुला थांबवली.
गाडी मध्ये दोन इसम बसलेले दिसले त्यांना पथकाची ओळख सांगुन त्यांना त्यांचे नाव गाव विचारले असता गाडी चालक याने त्याचे नाव १) विशाल पोपट निळे, वय २६ वर्ष, रा. कौठे धांदरपफळ, ता. संगमनेर तसेच शेजारी बसणारे इसमाने त्याचे नाव २) राजेंद्र बाळासाहेब तांबे, वय ३० वर्ष, रा. पेमगिरी, ता. संगमनेर असे सांगीतले त्यांना गाडीमध्ये काय आहे विचारले असता त्यांनी देशी दारुचे बॉक्स असल्याचे सांगितले.त्यांना पथकाने दारु वाहतुक परवाना आहे का?विचारले असता त्यांनी नकार दिला. तसेच त्यांना सदरचा माल कोणाचा व कोठे घेवुन जात असलेबाबत विचारपुस करता त्याने सदरचा माल हा ३) अक्षय मारुती वाकचौरे, रा. परखतपुर, ता. संगमनेर याचे सांगणेनुसार संगमनेर येथील अकोले नाका जवळील ४) उमेश सुर्यवंशी, रा.संगमनेर याचेकडुन खरेदी केला असुन कोतुळ येथे विकण्यासाठी जात असल्याचे सांगीतले. त्यांना झडतीचा उददेश सांगुन गाडीची पंचासमक्ष झडती घेतली असता गाडीमध्ये २,५९,०४०/- रु. किं.च्या देशी बॉबी संत्रा कं. च्या १८० मिली च्या १४८८ व ९० मिली च्या ८०० बॉटल मिळुन आल्या नमुद मुददेमाल तसेच वाहतुक करणारा एक सुपर कॅरी मालवाहतुक गाडी क्रं. एम.एच.१७ सी.व्ही. ४१६२ व दोन मोबाईल असा एकुण ४,६४,५४०/- रुपये किंमतीचा मुददेमाल पंचासमक्ष जप्त करण्यात आला आहे.गुन्हयातील आरोपी १) विशाल पोपट निळे, २) राजेंद्र बाळासाहेब तांबे, ३) अक्षय मारुती वाकचौरे(फरार) ४) उमेश सुर्यवंशी यांच्याविरूध्द अकोले पो.स्टे. गु.र.नं. २०८/२०२६ मु.प्रोव्हि.का.क. ६५ (अ), (ई), ८३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई ही श्री. सोमनाथ घार्गे,पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, श्री.सोमनाथ वाघचौरे, अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपुर, श्री. कुणाल सोनवणे, उपविभागीय पोलीस अधिकारी, संगमनेर, पो.नि. मोहन बोरसे, अकोले पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपुर कार्यालयातील पो.हे.कॉ. दादासाहेब लोढे, पो.हे.कॉ. संदीप दरंदले, पो.कॉ. राजेंद्र बिरदवडे, पो.कॉ. अशोक गाढे तसेच अकोले पोलीस स्टेशनचे पो.हे.कॉ. पोहेकॉ अनिल जाधव व पोकॉ महेंद्र गुंजाळ यांनी केली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास अकोले पोलीस स्टेशन करत आहे.
*Devashish Govind Tokekar*
*VANDE Bharat live tv news Nagpur*
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
*Indian Council of press,Nagpur*
Journalist Cell
*All India Media Association
Nagpur*
*District President*
*Delhi Crime Press*
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
*INDIAN PRESS UNION*
District Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015