logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

मोठी कारवाई! पदोन्नतीसाठी 3 लाखांची लाच घेणारे शिक्षण विभागाचे तिघे ACBच्या जाळ्यात

शिक्षण विभागातील भ्रष्टाचारावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) मोठी कारवाई करत पुणे जिल्हा परिषदेतील तीन अधिकारी-कर्मचाऱ्यांना रंगेहाथ पकडले आहे.

शिक्षकांच्या पदोन्नतीसाठी तब्बल 3 लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी ही धडक कारवाई करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, एका शिक्षकाची शिक्षण सेवक पदावरून उपशिक्षक पदावर पदोन्नती होण्यासाठी पंचायत समिती वेल्हे मार्फत प्रस्ताव शिक्षण विभागाकडे पाठवण्यात येणार होता. यासंदर्भात तक्रारदार शिक्षकाने जिल्हा परिषद पुणे येथील शिक्षण विभागाचे अधीक्षक राजेश खंदारे यांची भेट घेतली होती.

यावेळी, जात वैधता प्रमाणपत्र नसतानाही अधिसंख्य पदावर वर्ग करून देणे तसेच सेवा व सेवानिवृत्तीविषयक लाभ मिळवून देण्यासाठी खंदारे यांनी तब्बल 3 लाख रुपयांची लाच मागितली. या प्रकरणात अनिल रंधवे आणि अतिश शिंदे यांनीही सहभाग घेतल्याचे उघड झाले.

तक्रारदाराने 6 जानेवारी, 2026 रोजी ACB कडे तक्रार दाखल केली. त्यानंतर 11 फेब्रुवारी रोजी पडताळणी कारवाईदरम्यान आरोपींनी 3 लाख रुपयांची मागणी केल्याचे आणि त्यापैकी 25 हजार रुपये आधीच स्वीकारल्याचे स्पष्ट झाले. उर्वरित 2 लाख 75 हजार रुपयांची मागणी कायम ठेवण्यात आली होती.

यानंतर 6 एप्रिल रोजी ACB ने सापळा रचला. हडपसर येथील बी.टी. कवडे रोडवरील एव्हेन्यू मॉल परिसरात अनिल रंधवे आणि अतिश शिंदे यांनी 2 लाख 75 हजार रुपयांची लाच स्वीकारताच ACB च्या पथकाने त्यांना रंगेहात अटक केली.

या कारवाईत तिन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्या विरोधात वानवडी पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे शिक्षण विभागात एकच खळबळ उडाली आहे.

4
434 views

Comment