logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

Aima midiya jan jan ki avaj Date 8.4.2026 10:30 am पुणे, मुंबई, नागपूरसह २२ जिल्ह्यांत ‘एचआयव्ही’चा सर्वाधिक संसर्ग! सरकारचे आता उपाययोजनांचे मोठे पाऊ

Aima midiya jan jan ki avaj Date 8.4.2026 10:30 am पुणे, मुंबई, नागपूरसह २२ जिल्ह्यांत ‘एचआयव्ही’चा सर्वाधिक संसर्ग! सरकारचे आता उपाययोजनांचे मोठे पाऊल
एचआयव्ही संसर्ग अधिक असलेल्या जिल्ह्यांमध्ये रुग्णांचे निदान, उपचार आणि संसर्ग प्रतिबंध या तीन टप्प्यांवर उपाययोजना करण्यात येणार आहेत, अशी माहिती राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्थेचे (नॅको) महासंचालक डॉ. राकेश गुप्ता यांनी दिली.पुणे : एचआयव्ही संसर्ग प्रतिबंधासाठी देशभरात जिल्हास्तरीय कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्यात महाराष्ट्रातील एचआयव्ही संसर्ग जास्त असलेल्या २२ जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. या जिल्ह्यांत पुणे, मुंबई उपनगर आणि नागपूरचा समावेश आहे. या जिल्ह्यांमध्ये उपाययोजनांचे मोठे पाऊल केंद्र आणि राज्य सरकारकडून उचलण्यात आले आहे. त्यामुळे आगामी काळात एचआयव्ही संसर्ग मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होणार आहे.एचआयव्ही संसर्ग अधिक असलेल्या जिल्ह्यांमध्ये रुग्णांचे निदान, उपचार आणि संसर्ग प्रतिबंध या तीन टप्प्यांवर उपाययोजना करण्यात येणार आहेत, अशी माहिती राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्थेचे (नॅको) महासंचालक डॉ. राकेश गुप्ता यांनी दिली. एचआयव्हीपासून असलेला सार्वजनिक आरोग्याचा धोका २०३० पर्यंत नष्ट करण्याचे उद्दिष्ट ‘नॅको’ने ठेवले असून, त्याअंतर्गत धोरणात्मक प्रतिसाद कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या वेळी डॉ. गुप्ता बोलत होते. ते म्हणाले, ‘एचआयव्ही नियंत्रणासाठी देश पातळीऐवजी जिल्हा पातळीवरून उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याचा सकारात्मक परिणाम दिसत आहे. यातून एचआयव्ही संसर्गाचा सार्वजनिक आरोग्याला असलेला धोका २०३० पर्यंत संपुष्टात येईल. महाराष्ट्रातील एचआयव्ही संसर्ग जास्त असलेल्या २२ जिल्ह्यांचा समावेश आहे.’

या कार्यशाळेत राज्याच्या आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. निपुण विनायक यांच्यासह नॅकोचे वरिष्ठ अधिकारी, राज्याच्या आरोग्य विभागाचे
पुणे, मुंबई, नागपूरसह २२ जिल्ह्यांत ‘एचआयव्ही’चा सर्वाधिक संसर्ग! सरकारचे आता उपाययोजनांचे मोठे पाऊल
एचआयव्ही संसर्ग अधिक असलेल्या जिल्ह्यांमध्ये रुग्णांचे निदान, उपचार आणि संसर्ग प्रतिबंध या तीन टप्प्यांवर उपाययोजना करण्यात येणार आहेत, अशी माहिती राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्थेचे (नॅको) महासंचालक डॉ. राकेश गुप्ता यांनी दिली.
Written by लोकसत्ता ऑनलाइन
April 8, 2026 10:12 IST

Follow Us
HIV cases in Maharashtra districts list | NACO HIV prevention program Pune Mumbai | National AIDS Control Organization India strategy | HIV treatment and diagnosis Maharashtra statistics
महाराष्ट्रातील २२ जिल्ह्यांमध्ये एचआयव्ही संसर्ग रोखण्यासाठी 'नॅको' आणि राज्य आरोग्य विभागाकडून विशेष उपाययोजना राबवण्यात येत आहेत. (संग्रहित छायाचित्र)
पुणे : एचआयव्ही संसर्ग प्रतिबंधासाठी देशभरात जिल्हास्तरीय कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्यात महाराष्ट्रातील एचआयव्ही संसर्ग जास्त असलेल्या २२ जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. या जिल्ह्यांत पुणे, मुंबई उपनगर आणि नागपूरचा समावेश आहे. या जिल्ह्यांमध्ये उपाययोजनांचे मोठे पाऊल केंद्र आणि राज्य सरकारकडून उचलण्यात आले आहे. त्यामुळे आगामी काळात एचआयव्ही संसर्ग मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होणार आहे.

एचआयव्ही संसर्ग अधिक असलेल्या जिल्ह्यांमध्ये रुग्णांचे निदान, उपचार आणि संसर्ग प्रतिबंध या तीन टप्प्यांवर उपाययोजना करण्यात येणार आहेत, अशी माहिती राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्थेचे (नॅको) महासंचालक डॉ. राकेश गुप्ता यांनी दिली. एचआयव्हीपासून असलेला सार्वजनिक आरोग्याचा धोका २०३० पर्यंत नष्ट करण्याचे उद्दिष्ट ‘नॅको’ने ठेवले असून, त्याअंतर्गत धोरणात्मक प्रतिसाद कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या वेळी डॉ. गुप्ता बोलत होते. ते म्हणाले, ‘एचआयव्ही नियंत्रणासाठी देश पातळीऐवजी जिल्हा पातळीवरून उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याचा सकारात्मक परिणाम दिसत आहे. यातून एचआयव्ही संसर्गाचा सार्वजनिक आरोग्याला असलेला धोका २०३० पर्यंत संपुष्टात येईल. महाराष्ट्रातील एचआयव्ही संसर्ग जास्त असलेल्या २२ जिल्ह्यांचा समावेश आहे.’

या कार्यशाळेत राज्याच्या आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. निपुण विनायक यांच्यासह नॅकोचे वरिष्ठ अधिकारी, राज्याच्या आरोग्य विभागाचे अधिकारी, जिल्हास्तरीय कार्यक्रम समन्वयक आदी उपस्थित होते.


हेही वाचा
आता रोगाचे निदानही ‘एआय’ करेल! जलद तपासणी अन् तातडीने अहवाल हाती…
राज्यातील एचआयव्ही संसर्ग
एकूण एयआयव्हीग्रस्त रुग्ण – ३.९९ लाख
एकूण लोकसंख्येतील रुग्णांचे प्रमाण – ०.२९ टक्के
सर्वाधिक संसर्ग असलेले जिल्हे
अहिल्यानगर, अमरावती, बीड, चंद्रपूर, धाराशिव, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई उपनगर, नागपूर, नांदेड, नाशिक, पालघर, परभणी, पुणे, रायगड, सांगली, सातारा, सोलापूर, ठाणे, वर्धा आणि यवतमाळ.

संसर्गाचा धोका कमी करणार
महाराष्ट्रात एचआयव्ही संसर्ग जास्त असलेल्या जिल्ह्यांत निदान, उपचार आणि संसर्ग प्रतिबंध या तीन पातळ्यांवर काम केले जाणार आहे. राज्यात सध्या ९० टक्के रुग्णांचे निदान, ९० टक्के रुग्णांवर उपचार आणि ९९ टक्के संसर्ग प्रतिबंध अशी स्थिती आहे. पुढील काळात निदान आणि उपचारांची स्थिती प्रत्येकी ९५ टक्क्यांवर नेण्यात येणार आहे. त्यामुळे एचआयव्ही संसर्गाचा धोका आगामी काळात मोठ्या प्रमाणात कमी करता येईल, अशी माहिती महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटीचे प्रकल्प संचालक डॉ. सुनील भोकरे यांनी दिली.

0
0 views

Comment