logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

Aima midiya jan jan ki avaj Date 7.4.2026 2:28 pm Metro : निगडी-चाकण मेट्रो मार्गाचा सुधारित आराखडा तयार; असा आहे आराखडा? पिंपरी-चिंचवड शहरात सद्य:स्थ

Aima midiya jan jan ki avaj Date 7.4.2026 2:28 pm Metro : निगडी-चाकण मेट्रो मार्गाचा सुधारित आराखडा तयार; असा आहे आराखडा?
पिंपरी-चिंचवड शहरात सद्य:स्थितीत दापोडी ते पिंपरी अशी मेट्रो धावते. या मार्गाचे निगडीतील भक्ती-शक्ती समूह शिल्प चौकापर्यंतचे ४.५१९ किमी अंतराच्या विस्तारीकरणाचे काम सुरू आहे.पिंपरी : ‘महाराष्ट्र मेट्राे रेल काॅर्पाेरेशन लिमिटेड’ने (महामेट्राे) पिंपरी-चिंचवड शहर आणि चाकण औद्योगिक पट्ट्यासाठी महत्त्वाकांक्षी मानल्या जाणाऱ्या प्रस्तावित भक्ती-शक्ती समूह शिल्प चौक ते चाकण या ४०.९२६ किलाेमीटर अंतराच्या नव्या मेट्राे मार्गाचा सुधारित आराखडा तयार केला आहे. या नवीन आराखड्यात काही भाग आणि स्थानकांच्या संख्येत वाढ करण्यात आली आहे. या आराखड्याचे महापालिका नगरसेवकांसमोर सादरीकरण केले जाणार आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात सद्य:स्थितीत दापोडी ते पिंपरी अशी मेट्रो धावते. या मार्गाचे निगडीतील भक्ती-शक्ती समूह शिल्प चौकापर्यंतचे ४.५१९ किमी अंतराच्या विस्तारीकरणाचे काम सुरू आहे. दापोडी ते निगडी या एकमेव मेट्रो मार्गानंतर दुसऱ्या टप्प्यात निगडीतील भक्ती-शक्ती समूह शिल्प चौक ते चाकण असा दुसऱ्या मार्गाचा आराखडा तयार करण्यात आला होता. त्यामध्ये ३१ स्थानके आणि उन्नत मार्ग असणार हाेता. पिंपरी-चिंचवड शहरात सर्वाधिक २५, तर चाकण नगर परिषद हद्दीत सहा स्थानके नियोजित आहेत. निगडी ते चाकण मेट्रो प्रकल्पासाठी १० हजार ३८३ कोटी ८९ लाख रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे.

निगडी ते चाकण आराखडा तयार करून मेट्राेने तो महापालिकेला ऑगस्टमध्ये सादर केला. तत्कालीन पालकमंत्री अजित पवार, शहरातील लाेकप्रतिनिधी, भागधारकांना या आराखड्याचे सप्टेंबरमध्ये सादरीकरण झाले. ‘वाढती लाेकसंख्या आणि प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन, आराखड्यामध्ये सुधारणा करून तीनऐवजी सहा डब्यांच्या गाड्या ठेवाव्यात, भक्ती-शक्ती चाैक ते तळवडे चाैकामार्गे चाकण एमआयडीसी असा मार्ग करावा, मेट्रो मार्गिकेचे संरेखन नाशिक फाटा-भोसरी असे करण्याबाबत विचार करावा, भोसरीतील सध्याचा उड्डाणपूल अडथळा ठरत असेल, तर तो काढून घ्यावा आणि गोडाउन चौक ते चाकण या मार्गाप्रमाणेच एकसारखी रचना नाशिक फाटा ते चाकणपर्यंत करावी, भुजबळ चौक, वाकड येथील दोन्ही मेट्रो मार्गांची रचना प्रवाशांना सोयीस्कर असावी, ⁠मेट्रो स्थानकाच्या जवळपास वाहनतळाची व्यवस्था करावी,’ अशा विविध सूचना लोकप्रतिनिधींनी केल्या हाेत्या. त्यांची दखल घेऊन सुधारित आराखडा तयार करण्यात आला आहे.असा आहे सुधारित आराखडा
निगडी ते चाकण आराखड्यात निगडीतील भक्ती-शक्ती समूहशिल्प चौक, ट्रान्सपोर्टनगर, गणेशनगर, मुकाई चौक, रावेत, पुनावळे गाव, पुनावळे, ताथवडेगाव, ताथवडे, भूमकर चौक, भुजबळ चौक, वाकड, विशालनगर कॉर्नर, कोकणे चौक, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, नाशिक फाटा, संत तुकारामनगर, वल्लभनगर (‘वायसीएम’जवळ), गवळीमाथा चौक, भोसरी एमआयडीसी, वखार महामंडळ गोदाम चौक, पीआयईसी, मोशीतील भारतमाता चौक, चिंबळी फाटा, बर्गेवस्ती, कुरुळी, आळंदी फाटा, नाणेकरवाडी, चाकण असा हा मार्ग असून, सुधारित आराखड्यात भोसरीचाही समावेश करण्यात आला आहे.

निगडी ते चाकण मेट्राे मार्गाच्या आराखड्यात तत्कालीन पालकमंत्र्यांच्या आदेशानुसार काही सुधारणा केल्या आहेत. त्यानुसार सुधारित आराखडा तयार केला आहे. महापाैरांसह सर्व नगरसेवकांसमाेर आराखड्याचे सादरीकरण केले जाईल. महापालिकेची मान्यता मिळाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे महामेट्राेचे व्यवस्थापकीय संचालक
श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.

3
157 views

Comment