*हिंगणा नगर पंचायतमध्ये अतिक्रमणावरून मोठा वाद! पथकाला अडथळा – पत्रकाराला धमकी!
*हिंगणा नगर पंचायतमध्ये अतिक्रमणावरून मोठा वाद! पथकाला अडथळा – पत्रकाराला धमकी!
हिंगणा नगर पंचायत परिसरात अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईदरम्यान मोठा वाद उफाळून आला आहे. शिवसेना (ठाकरे गट) चे नगरसेवक विष्णू कोल्हे यांनी नगर पंचायतच्या पथकाच्या कारवाईत अडथळा आणल्याचा गंभीर आरोप होत आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
या प्रकरणात बातमी प्रकाशित करणारे दलित पत्रकार प्रा. सतीश भालेराव यांना देखील धमकी दिल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. तसेच पोलिसांशीही उग्र भाषेत बोलत “अतिक्रमण हटवू देणार नाही” असा इशारा दिल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे, कोल्हे हे पोलिसांनाही धमकावत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
दरम्यान, या घटनेची माहिती पोलीस निरीक्षक, एसीपी, डीसीपी आणि सीपी स्तरापर्यंत देण्यात आली आहे. तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही याबाबत अवगत करण्यात आले आहे. नगर पंचायतचे मुख्याधिकारी धनंजय सरनाईक यांनीही या प्रकरणात पोलिसांकडे अधिकृत तक्रार दाखल करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले आहे.
याच पार्श्वभूमीवर, यापूर्वी वानाडोंगरी माजी नगराध्यक्ष यांच्या मुलगा स्वप्नील शहाकार याच्यावर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल होऊन त्याला जेल वारी करावी लागली होती, अशीही चर्चा पुन्हा रंगू लागली आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाला आता अधिकच गंभीर वळण मिळत आहे.
सध्या या प्रकरणाकडे नागरिकांचे आणि प्रशासनाचे लक्ष लागले असून, पुढे काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष आहे.
*Devashish Govind Tokekar*
*VANDE Bharat live tv news Nagpur*
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
*Indian Council of press,Nagpur*
Journalist Cell
*All India Media Association
Nagpur*
*District President*
*Delhi Crime Press*
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
*INDIAN PRESS UNION*
District Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015