logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

घरफोडी करणाऱ्या टोळीला अटक; दोन गुन्ह्यांचा उलगडा


जळगाव : शहर पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने गेंदालाल मिल भागातील तीन सराईत गुन्हेगारांना १ एप्रिल रोजी : ताब्यात घेतले आहे.

गेंदालाल मिल परिसरातील रईस शेख यांच्या घरी २३ ते २५ मार्च दरम्यान घरफोडी झाली होती. चोरट्यांनी घरातून १० हजार रुपये रोख आणि ४००

रुपये किमतीच्या चांदीच्या अंगठ्या असा ऐवज लंपास केला होता.

पोलिसांनी डॉ. आंबेडकर रिक्षा स्टॉप परिसरातून आदील शेख मजीद, गुफरान शेख करीम आणि कासिम सैय्यद अली (सर्व रा. गेंदालाल मिल) यांना ताब्यात घेतले.

0
83 views

Comment