गुन्हेगारांवर कायद्याचा वचक हवा SP श्री.सोमनाथ घार्गे यांचे श्रीरामपुरात प्रतिपादन...
गुन्हेगारांवर कायद्याचा वचक हवा SP श्री.सोमनाथ घार्गे यांचे श्रीरामपुरात प्रतिपादन...
श्रीरामपूर( शिवप्रहार न्यूज नेटवर्क) याबाबत अधिक माहिती अशी की, श्रीरामपुरात समाज कंटकांना,गुन्हेगारांना कायद्याचे भय असलेच पाहिजे.मात्र सर्वसामान्य नागरिकाला पोलिसांकडे येताना सुरक्षित वाटले पाहिजे.तसेच गुन्हेगारीमुक्त आणि शांतताप्रिय समाजासाठी पोलीस व जनता यांच्यातील 'संवाद' हाच सर्वात मोठा दुवा आहे. गुन्हेगारांवर कायद्याचा वचक हवा मात्र सर्वसामान्य नागरिकाला पोलीस ठाण्यात येतांना भीती वाटू नये असे प्रतिपादन अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक श्री.सोमनाथ घार्गे यांनी केले.
गेल्या काही दिवसांपासून शहरात असलेल्या तणावपूर्ण वातावरणामुळे श्रीरामपूर येथे आयोजित जनसंवाद कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर अतिरिक्त पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, पोलीस उपाधीक्षक जयदत्त भवर, श्रीरामपूर शहर पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, पोलीस निरीक्षक अरुण धनवटे आणि मुख्याधिकारी मच्छिद्र घोलप उपस्थित होते.दरम्यान शहरातील उपस्थित विविध क्षेत्रांतील प्रतिष्ठित नागरिक, व्यावसायिक यांनी शहराच्या कायदा व सुव्यवस्थेबाबत आपले विचार मांडले.
*Devashish Govind Tokekar*
*VANDE Bharat live tv news Nagpur*
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
*Indian Council of press,Nagpur*
Journalist Cell
*All India Media Association
Nagpur*
*District President*
*Delhi Crime Press*
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
*INDIAN PRESS UNION*
District Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015