logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली : 21 वर्षांच्या कारकिर्दीत तुकाराम मुंढे यांची ही 24 वी बदली झाली आहे.

कोल्हापूर, प्रतिनिधी :
राज्याच्या प्रशासकीय वर्तुळात 'सिंघम' अशी ओळख असलेले 2005 बॅचचे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची दिव्यांग कल्याण विभागाच्या सचिव पदावरून बदली करण्यात आली आहे. आता त्यांची नियुक्ती मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन तसेच महसूल व वन विभाग या महत्त्वाच्या विभागांच्या प्रधान सचिवपदी करण्यात आली आहे. नियमानुसार एखाद्या पदावर तीन वर्षे काम करणे अपेक्षित असताना,मुंढे यांची सरासरी वर्षभरातच बदली होण्याचे सत्र यंदाही कायम राहिले आहे.
तुकाराम मुंढे ज्या विभागात जातात तिथे ते कामात पारदर्शकता आणि शिस्त आणण्यावर त्यांचा भर असतो. दिव्यांग मंत्रालयाचे सचिव म्हणून काम करताना त्यांनी विभागातील अनेक प्रलंबित प्रकरण मार्गी लावले आणि वर्षानुवर्षे चालणारे गैरप्रकार चव्हाट्यावर आणले होते. मुंढे यांच्या कार्यशैलीमुळे सामान्य जनतेला नेहमीच दिलासा मिळतो. कार्यालयात वेळेवर न येणारे कर्मचारी असोत किंवा राजकीय दबावाखाली चुकीचे काम करणारे अधिकारी मुंढे कोणाचीही गय करत नाहीत. कोणत्याही राजकीय हस्तक्षेपाशिवाय निर्णय घेण्याच्या त्यांच्या वृत्तीमुळे ते सत्ताधाऱ्यांच्या पसंतीस उतरत नाहीत. यामुळेच 21 वर्षांच्या सेवेत 24 बदल्या झाल्या आहे.
IAS तुकाराम मुंढे यांची आतापर्यंतची कारकीर्द
ऑगस्ट 2005 - प्रशिक्षणार्थी, उपजिल्हाधिकारी सोलापूर.
सप्टेंबर 2007 - उप जिल्हाधिकारी, देगलूर उपविभाग.
जानेवारी 2008 - सीईओ, जिल्हा परिषद नागपूर.
मार्च 2009 - आयुक्त, आदिवासी विभाग.
जुलै 2009 - सीईओ, वाशिम.
जून 2010 - सीईओ, कल्याण.
जून 2011 - जिल्हाधिकारी, जालना.
सप्टेंबर 2012 - विक्रीकर सहआयुक्त मुंबई.
नोव्हेंबर 2014 - सोलापूर जिल्हाधिकारी.
मे 2016 - आयुक्त, नवी मुंबई महापालिका.
मार्च 2017 - मुख्य कार्यकारी अधिकारी, पीएमपीएल, पुणे.
फेब्रुवारी 2018 - आयुक्त, नाशिक महापालिका.
नोव्हेंबर 2018 - सहसचिव, नियोजन.
डिसेंबर 2018 - प्रकल्प अधिकारी, एड्स नियंत्रण, मुंबई.
जानेवारी 2020 - आयुक्त, नागपूर महापालिका.
ऑगस्ट 2020 - सदस्य सचिव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, मुंबई.
जानेवारी 2021 - राष्ट्रीय मानवाधिकार आयोग भारत.
सप्टेंबर 2022 - आयुक्त आरोग्य सेवा व संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान.
एप्रिल 2023 - सचिव पशुसंवर्धन आणि दुग्धविकास
जून 2023 - सचिव मराठी भाषा विभाग
जुलै 2023 -कृषी व पशुसंवर्धन विभागाचे सचिव
जून 2024 - विकास आयुक्त, असंघटित कामगार विभाग
ऑगस्ट 2025- सचिव, दिव्यांग कल्याण आयुक्त मंत्रालय
आता आपत्ती व्यवस्थापन आणि पुनर्वसन सारख्या संवेदनशील विभागाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे. आगामी काळात या विभागात ते कोणती 'मुंढे स्टाईल' शिस्त लावतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

6
866 views

Comment