logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

अवकाळीचा हाहाकार शेतकरी मृत्युमुखी;श्रीरामपुरातही बत्तीगुल...

अवकाळीचा हाहाकार शेतकरी मृत्युमुखी;श्रीरामपुरातही बत्तीगुल...


श्रीरामपूर/राहता ( शिवप्रहार न्यूज नेटवर्क)राहाता तालुक्यातील लोणी खुर्द येथील मापरवाडी भागात राहणारे सोमनाथ जिजाबापू गाडगे या शेतकऱ्याचा सोमवारी सायंकाळी वीज पडून दुर्दैवी मृत्यू झाला. सोमनाथ हे ३६ वर्षांचे होते.मापरवाडी भागात त्यांची दोन ठिकाणी शेती आहे. घरापासून ०१ किलोमीटर अंतरावर असलेल्या जमिनीत त्यांनी कांदा लागवड केली आहे सोमवारी काही महिला मजुरांना कांदा काढणीचे काम दिले होते. दिवसभर कांद्याची काढणी केल्यानंतर सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली.महिला मजूर पावसापासून बचावासाठी प्लास्टिक कागदाच्या आश्रयाला असताना त्यांच्यापासून काही अंतरावर असलेल्या सोमनाथ यांच्यावर वीज कोसळली.मोठा आवाज झाला आणि आगीचे लोळ सोमनाथ यांच्या अंगावर कोसळले.त्यात जागेवरच त्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
श्रीरामपूर शहरासह तालुक्याला देखील कालच्या अवकाळी पाऊसाने चांगलेच झोडपून काढले असून या पावसामुळे अनेकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.शेतकऱ्यांच्या पिकांबरोबरच शहरातील अनेक ठिकाणी होर्डिंग्स या अवकाळी पावसासोबत असलेल्या वाऱ्यामुळे फाटले आहे.तसेच काहींच्या पत्र्याच्या घराचे पत्रे देखील उडून गेले.तर काही ठिकाणी झाडं देखील कोसळल्याच्या घटना घडल्या आहे.श्रीरामपूर-बेलापूर रोडवर एक झाड पडलेले दिसले.श्रीरामपुरात काल संध्याकाळपासून विजेचा प्रवाह देखील खंडित झालेला आहे.बत्ती गुल असल्याने नागरिक हैराण झाले आहेत.

*Devashish Govind Tokekar*
*VANDE Bharat live tv news Nagpur*
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
*Indian Council of press,Nagpur*
Journalist Cell
*All India Media Association
Nagpur*
*District President*
*Delhi Crime Press*
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
*INDIAN PRESS UNION*
District Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

0
0 views

Comment