logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

३० मार्चच्या मध्यरात्री पावसाचे थैमान; आंबा,अन् मोहफुलांच्या नुकसानीने ग्रामीण भागात आर्थिक फटका

कन्हैया क्षीरसागर
[देवरी/फुक्किमेटा], ३१ मार्च:
काल, ३० मार्चच्या मध्यरात्री परिसरात अचानक आलेल्या अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह झालेल्या या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या शेती आणि नैसर्गिक उत्पादनांचे 'फुल एचडी' (मोठ्या प्रमाणावर) नुकसान झाले आहे.
मोहफुलांचे आणि आंब्याचे अतोनात नुकसान:
सध्या मोहफुले वेचण्याचा हंगाम जोरात सुरू आहे. मात्र, मध्यरात्री झालेल्या पावसामुळे झाडाखाली पडलेली मोहफुले भिजून खराब झाली आहेत. पावसामुळे मोहफुले काळी पडल्याने त्यांना आता बाजारात योग्य भाव मिळणार नाही, अशी भीती शेतकरी व्यक्त करत आहेत. तसेच, आंब्याला आलेला मोहर (मोहरा) या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर झडून गेल्याने बागायतदारांचेही अतोनात आर्थिक नुकसान झाले आहे.
रात्रभर वीज गुल, नागरिक त्रस्त:
पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे महावितरणच्या यंत्रणेत बिघाड होऊन रात्रीपासूनच संपूर्ण परिसराचा वीजपुरवठा खंडित झाला होता. रात्रभर वीज नसल्यामुळे नागरिकांना अंधारातच राहावे लागले. सकाळी उशिरापर्यंत काही भागांत वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम सु

14
599 views

Comment