logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

महावितरण कंपनीचा भोंगळ कारभार पूर्वसूचना न देताच वीज कनेक्शन कट करणे चालू

महावितरण कंपनीचा भोंगळ कारभार पूर्वसूचना न देताच वीज कनेक्शन कट करणे चालू

कळंब (शिवप्रसाद बियाणी ) येथे सध्या मार्च अखेर च्या नावाखाली एमएसईबी कंपणी ग्राहकांना विनाकारण त्रास देणे सुरू आहे कुठलीही पूर्वसूचना न देता डायरेक्ट लाईट कनेक्शन कट केले जात आहे त्यामुळे ग्राहकांना खूप मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
कळंब शहरात तथा आजूबाजूतील अनेक गावांमध्ये सध्या महावितरण कंपनीचा भोंगळ कारभार सुरू असलेला दिसून येत आहे. कलम 56 क्र नुसार कोणत्याही वीज ग्राहकाचे लाईट कनेक्शन कट करण्याच्या अगोदर पंधरा दिवस अगोदर मोबाईल एसएमएस द्वारे किंवा लेखी नोटीसद्वारे वीज खंडित करण्यात येईल असा संदेश ग्राहकापर्यंत पोहोचवणे अनिवार्य असताना देखील कळंब महावितरण कंपनी कुठल्याही ग्राहकांना पूर्व सूचना न देता सध्या लाईट कनेक्शन कट करण्याचा सपाटा सुरू आहे तसेच ज्या ग्राहकांना मोबाईल कळत नाही त्यांनी काय करावे व ते खूप लांबून महावितरण कंपनीच्या दारात बिल भरण्यासाठी जात असताना महावितरण कंपनीचे बिल भरणा केंद्र बंद असल्याचे दिसून येत आहे. एकीकडे महागाई ने सर्वसामान्य माणूस घोरपडत आहे.
शेतातील उत्पन्नाला भाव येत नाही नैसर्गिक आपत्तींना संकटाच्या पाठीमागून संकट येत आहेत त्याच अनुषंगाने महाराष्ट्र राज्य सरकारने शेतकऱ्यांची दोन लाखाचे कर्ज माफी केली आणि एकीकडे अशा खाजगी महावितरण कंपन्या सर्वसामान्य माणसांच्या वसुलीच्या तगादा लावत डायरेक्ट लाईट कनेक्शन कट करत आहेत.
आता ऑनलाईन मीटर आलेले आहेत त्यांची वसुली ऑनलाईन पद्धतीने करण्यात येईल पण ज्या गोरगरीब मुजरानकडे स्मार्ट फोनच नाही त्यांनी काय करायचं त्यांनी फक्त महावितरण कंपणी च्या चकरा मारायच्या बास झाले आता महावितरण कंपनी जाहीर निषेध करत किती उलट सुलट महावितरण कंपनीच्या संदर्भात चर्चा सुरू असलेली दिसून येत आहे. तसेच ठिकठिकाणी गल्ली बोळामध्ये चौरस्ता मध्ये लाईटच्या तारा ही खाली आल्या मुळे वाहनांना खूप त्रास सहन करावा लागत आहे आणि याचा धोका निर्माण होऊ शकतो
हे काम सुद्धा वारंवार तक्रार देऊनही महावितरण कंपनी पूर्ण करत नाही त्याबद्दल देखील चर्चा गुलदस्ता मध्ये आहे. तसेच कळम शहरातील नगरपालिका याचा वीज भरणा किती थकीत आहे आणि सर्वसामान्याला पाणीपुरवठा बंद झालेला दिसून येत आहे वीज खंडित केल्यामुळे
चौकट
सहाय्यक अभियंता यांना वीज ग्राहक कळंब शहरांमध्ये किती आहेत ते विचारणा केली असता त्यांना माहीत नाही तसेच स्मार्ट का मीटर तुम्ही शहरांमध्ये किती ठिकाणी बसवलेले आहेत ते सुद्धा त्यांना आकडेवारी माहित नाही त्यांनी सांगितले

विज ग्राहक
सध्या स्मार्ट मीटर बसवणे चालू आहे त्याच अनुषंगाने बत्ती गुल फिल्म प्रमाणे शासनाने महावितरण कंपनीला निर्णय जारी करावा युनिट प्रमाणे बिल आकारण्यात यावे इतर चार्जेस त्या बिलामध्ये देऊ नये कारण ज्याप्रमाणे स्मार्टफोन किंवा टीव्ही रिचार्ज आपण करतात त्याचप्रमाणे महावितरण कंपनी आता बिल आकारणी करत आहे म्हणून इतर चार्जेस बिलामध्ये लावु नये

*Devashish Govind Tokekar*
*VANDE Bharat live tv news Nagpur*
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
*Indian Council of press,Nagpur*
Journalist Cell
*All India Media Association
Nagpur*
*District President*
*Delhi Crime Press*
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
*INDIAN PRESS UNION*
District Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

4
80 views

Comment