“मी आई जिजाऊ”तून उलगडला संस्कारांचा सोहळा; सिने आभिनेत्री अलका कुबल यांच्या हस्ते गुणवंतांचा गौरव
पोदार लर्न इंग्लिश स्कूल उद्घाटन सोहळ्यात वेशभूषा
“मी आई जिजाऊ”तून उलगडला संस्कारांचा सोहळा; सिने आभिनेत्री अलका कुबल यांच्या हस्ते गुणवंतांचा गौरव
पोदार लर्न इंग्लिश स्कूल उद्घाटन सोहळ्यात वेशभूषा, चित्रकला व फॅन्सी ड्रेस स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद
अमळनेर प्रतिनिधी :
अमळनेर येथे पोदार इंग्लिश स्कूलच्या उद्घाटनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धांनी सांस्कृतिक, शैक्षणिक आणि प्रेरणादायी असा सुंदर संगम घडवून आणला. विशेषतः “मी आई जिजाऊ” या विषयावर घेण्यात आलेल्या भव्य वेशभूषा स्पर्धेने उपस्थितांचे मन जिंकले.
या स्पर्धेत महिलांनी राजमाता जिजाऊंची भूमिका प्रभावीपणे साकारत इतिहासाचा संदेश जिवंत केला. स्पर्धेतील विजेते पुढीलप्रमाणे —
प्रथम : वैशाली सपकाळे
द्वितीय : प्रगती चंद्रकांत कंखरे
तृतीय : मेघना यतीन पवार
उत्तेजनार्थ : केया प्रमोद खैरनार, रागिणी जयंत पाटील
या सर्व विजेत्यांना “माहेरची साडी” फेम अभिनेत्री अलका कुबल यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व बक्षिसे प्रदान करण्यात आली.
त्याचबरोबर आयोजित फॅन्सी ड्रेस स्पर्धेत लहानग्यांनी आपल्या कल्पकतेचा सुरेख आविष्कार सादर केला. यात
पार्थ रोहित ठाकूर, उमैना सैफी, सैफुद्दीन जावेद, आर्या ब्राह्मणकर, रुद्रांश येवले, सवय जैन
यांना मान्यवरांच्या शुभहस्ते गौरविण्यात आले.
रंगभरण व चित्रकला स्पर्धा (नर्सरी ते पहिली) मध्ये —
प्रथम : दुर्वा प्रशांत पवार (सायकल)
द्वितीय : अरुण सपकाळे (एज्युकेशन लॅपटॉप)
तृतीय : संकेत हरिओम पंजाबी (एज्युकेशन किट)
यांना आकर्षक बक्षिसे प्रदान करण्यात आली.
ग्रेट भेट : अहिराणी शब्दांची जादू, हास्याचा वर्षाव
कार्यक्रमात एक वेगळाच रंग भरला तो अहिराणी मराठी कथाकार तथा ‘आयत पोयतं सख्यानं’ चे निर्माते, समाजभूषण प्रा. प्रवीण माळी सर यांच्या सादरीकरणाने.
अहिराणी भाषेतील लग्नाच्या रीतीरिवाजांचे, प्रत्येक तालुका व गावागावातील बोलीभाषेचे त्यांनी केलेले विनोदी आणि जिवंत चित्रण श्रोत्यांना अक्षरशः पोट धरून हसायला लावणारे ठरले. त्यांच्या या सादरीकरणाने कार्यक्रमात उत्साहाची नवी उंची गाठली.
कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरलेल्या अभिनेत्री अलकाताई कुबल यांनी विद्यार्थ्यांना व पालकांना मार्गदर्शन करताना सांगितले की,
“आजच्या स्पर्धात्मक युगात टिकून राहण्यासाठी विद्यार्थ्यांकडे विविध भाषांवर प्रभुत्व असणे गरजेचे आहे. पोदार इंग्लिश स्कूलसारख्या दर्जेदार संस्थेत प्रवेश घेतल्यास विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल होऊ शकते.”
यापुढे म्हणाल्या की
शाळेचा परिसर पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत निसर्गरम्य व मनोहारी असून, शाळेची भव्य-दिव्य वास्तू विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी वातावरण निर्माण करते. त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्यांचा प्रवेश आजच निश्चित करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी योग्य पाऊल उचलावे. पोदार इंग्लिश मीडियम स्कूलमधून विद्यार्थ्यांची स्वप्ने साकार होऊ शकतात, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या प्रसंगी उपस्थित मान्यवरांमध्ये
उद्योगपती सुनील झवर, सौ. मृणाल अमोल पाटील, सौ. शैलजा रणजित शिंदे, नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर, नगरसेविका जयश्री पाटील, राष्ट्रवादी महिला प्रमुख तिलोत्तमाताई पाटील, काँग्रेसच्या सुलोचना वाघ, माधुरी पाटील, प्रा. प्रवीण माळी, रील स्टार चेतन कुमावत, साने गुरुजी वाचनालयाचे चिटणीस प्रकाश वाघ यांची प्रमुख उपस्थिती होती.
या सर्व मान्यवरांचा सन्मान पोद्दार लर्न स्कूलच्या चेअरमन सौ. अर्चनाताई सूर्यवंशी व संचालक प्रशांत सूर्यवंशी यांनी वृक्ष देऊन केला.
कार्यक्रमादरम्यान सिने अभिनेत्री
अलकाताई कुबल यांच्यासोबत अनेकांनी फोटोसेशन करत जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी साने गुरुजी वाचनालयाचे चिटणीस प्रकाश वाघ व संचालक ईश्वर महाजन यांनी त्यांना वाचनीय पुस्तक भेट देऊन सत्कार केला.
निसर्गरम्य वातावरणात उभारलेली पोद्दार इंग्लिश स्कूल ही संस्था विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचा विश्वास संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाला महिलांचा मोठा प्रतिसाद लाभला आणि संपूर्ण वातावरणात संस्कार, इतिहास आणि प्रेरणेचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी
सौ. अर्चनाताई सूर्यवंशी, प्रशांत सूर्यवंशी, प्रकाश वाघ, अभियंता निलेश वाघ, नीरज वाघ, अरुण सपकाळे यांनी विशेष परिश्रम घेतले.
तर कार्यक्रमाचे प्रभावी व बहारदार सूत्रसंचालन सरिता खाचणे मॅडम यांनी केले.
ही केवळ स्पर्धा नव्हती, तर संस्कारांची शिदोरी देणारा, हास्याची उधळण करणारा आणि इतिहासाची जाणीव करून देणारा अविस्मरणीय सोहळा ठरला.