logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

श्री काळभैरवनाथ यात्रा महोत्सव उरूळी देवाची जयत तयारी.

दि ३० हवेली उरूळी देवाची (प्रतिनिधी-अंबादास गोरे)

हवेली तालुक्यातील उरूळी देवाची या ठिकाणी दि.०२/०४/२०२६ गुरूवार रोजी ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ यात्रा महोत्सवानिमित्त जयत तयारी करण्यात येत आहे.

गावातील रस्ते दुरुस्ती पाण्याची व्यवस्था विद्युत रोषणाई दुकाने थाटवण्यासाठी साफसफाई इ बाबींची तयारी करण्यात आली आहे.

यात्रेनिमित्त गावांमध्ये शांतता व सुव्यवस्थे बाबत फुरसुंगी पोलिस स्टेशनचे श्री ढावरे साहेब यांना निवेदन देण्यात आले आहे.

यावेळी उरुळी देवाची गावचे मा सरपंच श्री.तात्यासाहेब भाडळे पाटील, मा.सरपंच लक्ष्मण नेवसे,रविंद्र सातव, अमित भाडळे पाटील, अशोक कामथे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

33
8998 views

Comment